आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेन-रशिया युद्धाचा शुक्रवारी ७९ वा दिवस होता. रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले होते. तत्पूर्वी गुरुवारी रात्री युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी समेटाबद्दल चर्चेस तयार आहे.
ते म्हणाले, उभय देशांत करार व्हावा असे आम्हाला वाटते. परंतु अटीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा अल्टिमेटम असू नये. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले, युक्रेन कधीही क्रिमियाला रशियाचा भाग मानू शकत नाही. २०१४ मध्ये माॅस्काेने क्रिमियावर ताबा मिळवला होता. क्रिमियाची नेहमीच स्वायत्तता राहिली आहे. क्रिमियाची स्वतंत्र संसद आहे. परंतु ती युक्रेनमध्ये आहे. त्यातच आता अमेरिका व ब्रिटनने युक्रेनला आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
अमेरिका आणि ब्रिटनने मदतीचा हात दिला आहे. त्यावरून अमेरिका-ब्रिटनसह युरोपातील देशांनी युक्रेनला मदत करू नये. या प्रश्नी लुडबूड खपवून घेतली जाणार नाही, अशी धमकी रशियाने दिली. त्यानंतर तणावात वाढ झाली होती. परंतु अमेरिकेसह इतर देशांनी देखील युक्रेनसारख्या युद्धग्रस्त देशाला मदत देण्याचे जाहीर केले होते. अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे रशियावर दबाव वाढत असल्याचे वाटत असतानाच युक्रेनने पुन्हा एकदा समेट घडवण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी क्रिमिया मात्र चर्चेतून वगळावा असेच संकेत आपल्या आवाहनातून दिले आहेत. त्याला आता रशिया कशाप्रकारे प्रतिसाद देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.