आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅशिंग्टन:नागरिकत्व विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; 5 लाख भारतीयांना फायदा

वाॅशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘अमेरिकन ड्रीम अँड प्राॅमिस अॅक्ट’ हे महत्त्वाचे विधेयक मंजूर

अमेरिकी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हने ‘अमेरिकन ड्रीम अँड प्राॅमिस अॅक्ट’ हे महत्त्वाचे विधेयक मंजूर केले आहे. त्याचा फायदा अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याची प्रतीक्षा असलेल्या ५ लाखांवर भारतीयांना मिळू शकतो.

हे विधेयक २२८ विरुद्ध १९७ मतांनी मंजूर झाले. त्यानंतर ते वरिष्ठ सभागृह सिनेटकडे पाठवण्यात आले. सिनेटमध्ये ते मंजूर झाले तर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. बायडेन यांचा आधीपासूनच या विधेयकाला पाठिंबा आहे. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये विधेयक मंजूर झाल्यावर सिनेटनेही मंजुरी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. हे विधेयक म्हणजे बायडेन यांच्या इमिग्रेशन अजेंड्याकडील पहिले पाऊल आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेले प्रतिबंध हटवावे, अशी मागणी बायडेन यांच्या डेमाॅक्रॅटिक पार्टीच्या पाच सिनेटर्सनी केली आहे.

नव्या कायद्याचा फायदा होणारे अमेरिकेतील ‘ड्रीमर्स’ कोण?
ज्यांच्याकडे वैध दस्तऐवज नाही अशा १ कोटी १० लाख स्थलांतरित नागरिकांना ‘अमेरिकन ड्रीम अँड प्राॅमिस अॅक्ट’मुळे अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. त्यांनाच अमेरिकेत ‘ड्रीमर्स’ म्हटले जाते. म्हणजेच जे आई-वडिलांसह बालपणी अमेरिकेत आले असे अप्रत्यक्ष स्थलांतरित. दस्तऐवज नसल्याने त्यांना कायदेशीर निगराणीत राहावे लागते.

बातम्या आणखी आहेत...