आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:भारतवंशीय अमेरिकी न्यूयॉर्कचा कारभार हाकण्याच्या तयारीत; बायडेन यांच्या टीममध्ये 56 भारतवंशीय, इतर राज्यांतही वाढतोय प्रभाव

अमेरिकाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व उमेदवारांना डेमोक्रॅटिकने उमेदवारी दिली

गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन मंगळ ग्रहावर रोव्हर उतरल्याच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेनंतर नासाच्या संशोधकांशी संवाद साधत होते. नासाच्या या मोहिमेला मार्गदर्शन, नेव्हिगेशन व त्यावरील संपूर्ण निगराणीची जबाबदारी भारतवंशीय स्वाती मोहन पार पाडत होत्या. भारतवंशीय अमेरिकी आज अमेरिकेत नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत, असे गौरवोदगार त्यांनी काढले. बायडेन यांनी ५६ भारतवंशीय अमेरिकींना आपल्या प्रशासकीय टीममध्ये समाविष्ट केले आहे. आता भारतवंशीय अमेरिकेच्या राज्यांतही आपली मजबूत अशी उपस्थिती दर्शवू लागले आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे न्यूयॉर्कच्या सिटी कौन्सिलच्या सदस्यांची निवडणूक होय. सिटी कौन्सिल निवडणुकीत पहिल्यांदाच भारतवंशीयांचा दबदबा वाढला. कौन्सिलच्या निवडणुकीत १६ दक्षिण आशियाई उमेदवार आहेत. पहिल्यांदाच १० भारतवंशीय अमेरिकी निवडणूक रिंगणात उतरले.

सिटी कौन्सिल निवडणूक

  • ५१ जिल्ह्यांसाठी २२ जून रोजी निवडणूक होणार आहे. अर्जासाठी २५ मार्च अंतिम तारीख. कार्यकाळ चार वर्षांचा असतो.
  • भारतवंशीय लोकांचा प्रभाव न्यूयॉर्कमध्ये वेगाने वाढत आहे. येथे ७ लाखांहून जास्त भारतीय आहेत.
  • डेमोक्रॅटिक पार्टीने या सर्व उमेदवारांना तिकीट दिले. बहुतांश उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.
  • बांगलादेश वंशाचे ५ अमेरिकी नागरिकही मैदानात आहेत. फातिमा या पाकिस्तानी वंशाच्या एकमेव लढत आहेत.

सूरज पर्यावरण सल्लागार फर्मचे संचालक
सूरज १९९८ मध्ये पॅरासायकॉलॉजीमध्ये वासंतिक वर्गासाठी न्यूयॉर्कला आले होते. आता ते पर्यावरण समुपदेशन फर्मचे संचालक आहेत. ते म्हणाले, आमच्या भागाचे प्रतिनिधित्व स्थलांतरिताकडे हवे.- सूरज जसवाल

स्थलांतरिताची फेलिसिया मुलगी
फेलिसिया सिंह एका स्थलांतरित चाकरमानी कुटुंबातील मुलगी. पेशाने शिक्षक. फेलिसिया म्हणाल्या, आमच्या कुटुंबासारखे लोक शहराला खूप काही देतात. परंतु त्यांना परतावा काही मिळत नाही. त्यावर मला काम करायचेय. - फेलिसिया सिंह

संजीव जिंदल २००३ मध्ये अमेरिकेला
भारतात अभियंता झालेल्या संजीव यांनी २००३ मध्ये अमेरिका गाठली. १० वर्षे संघर्ष केला. छोटे व्यापारी, सार्वजनिक सुरक्षा, आरोग्य व्यवस्था, स्थलांतरितांसाठी काम करण्याचा त्यांचा मानस. -संजीव जिंदल

टॅक्सीचालकाची २६ वर्षीय मुलगी जसलीन
जसलीन कौर एका टॅक्सीचालक व ग्रॉसरी स्टोर वर्करची मुलगी आहे. त्या जिंकल्यास त्या पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती व महिला ठरतील. टॅक्सीचालकांना कर्ज संकटातून बाहेर काढण्याची जसलीनची इच्छा आहे.- जसलीन कौर

बातम्या आणखी आहेत...