आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडात 2 समुदायांत संघर्ष, 10 ठार:धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला, 15 जखमी; 2 संशयितांचा शोध सुरू

ओटाव्हा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडा पोलिसांनी डेमन सँडरसन व माइल्स सँडरसन या 2 संशयितांचे छायाचित्र जारी केले आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

कॅनडाच्या सस्केचेवान प्रांतात 2 समुदायांत हिंसक झडप झाली आहे. त्यात 10 जण ठार, तर 15 जण जखमी झालेत. पोलिस या प्रकरणी 2 संशयितांचा शोध घेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांचे नाव डेमन सँडरसन व माइल्स सँडरसन आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वच जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेनंतर काही जखमींनी स्वतःच रुग्णालयात धाव घेतली.

पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून या घटनेचा तपासही सुरू आहे.
पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून या घटनेचा तपासही सुरू आहे.

हल्ल्याचे कारण समजले नाही

रॉयल कॅनडियन माउंटेड पोलिस सस्केचेवानच्या सहाय्यक आयुक्त रॉन्डा ब्लॅकमोर यांनी सांगितले की, हा हल्ला कशामुळे झाला हे अद्याप समजले नाही. काही संशयितांनी हेतुपुरस्सर पीडितांवर हल्ला केल्याचा संशय आहे.

कॅनडा पोलिसांचे न्यायवैद्यक पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
कॅनडा पोलिसांचे न्यायवैद्यक पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

पोलिसांकडून आरोपींचा शोध

डेमन सँडरसन व माइल्स सँडरसन या संशयितांना शेवटच्यावेळी रेजिना शहरात पाहण्यात आले होते. दोघेही काळ्या रंगाच्या कारमधून पसार झाले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले - आता ते त्याच कारमध्ये आहेत किंवा नाही हे आम्हाला ठावूक नाही. आमच्या मते, ते रेजिना शहरातून पळून गेलेत. तूर्त आम्ही सस्केचेवान प्रांतातील सर्वच तपास नाक्यांवरील सुरक्षा वाढवली आहे. जनतेलाही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.
पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.

पीएम जस्टिन ट्र्युदोंनी व्यक्त केला शोक

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्र्युदो यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते एका ट्विटद्वारे म्हणाले - ही घटना अत्यंत भीतीदायक व दुखद आहे. सरकारची स्थितीवर बारीक नजर आहे.

त्यांनी जनतेला स्थानिक प्रशासनाशी संवाद साधण्याचे आवाहन करत घटनास्थळी तैनात सुरक्षा रक्षकांचे आभारही मानले.

13 ठिकाणी आढळले मृत व जखमी

ही घटना एक स्थानिक समुदाय जेम्स स्मिथ क्री नेशन व सस्केचेवान प्रांताजवळील वेल्डन शहरात घडली. दोन्ही समुदायाचे लोकांनी एकूण 13 ठिकाणांवर एकमेकांसोबत मारहाण केली. या सर्वच ठिकाणी मृत व जखमी आढळलेत.

जेम्स स्मिथ क्रीन नेशनची लोकसंख्या 2500 आहे. येथे स्थानिक पातळीवर आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तर सस्केचेवान प्रांतातील जनतेला सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याची सूचना करण्यात आली आहे. सस्केचेवानमध्ये 'डेंजरस पर्सन' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...