आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणप्रेमींचे अजब आंदोलन:900 गाड्यांचे टायर केले पंक्चर, म्हणाले- कारमधून कार्बन उत्सर्जन वाढल्याने धोका

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द टायर एक्टिंग्विशर' नावाच्या पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आठ देशांमध्ये अनोखी मोहीम सुरू केली आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 900 गाड्यांचे टायर पंक्चर केले. आता तुम्ही म्हणाल की, ही मोहीम तर अजबच आहे. अर्थात या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा एकच विचार आहे की, बदलत्या हवामान आणि त्याचा दुष्परिणामाकडे लोकांचे लक्ष जावे, यासाठी ही अनोखी मोहीम किंवा आंदोलन या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे.

'द गार्डियन' यांच्या अहवालानुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क, नेदरलँड्समधील अ‌ॅमस्टरडॅम व एन्शेड, फ्रान्समधील पॅरिस आणि ल्योन, जर्मनीतील बर्लिन, बॉन, एसेन, हॅनोवर आणि सारब्रुकेन, ब्रिस्टल, लीड्स, लंडन व ब्रिटनमधील डंडी, स्वीडनमधील मालमो इन्सब्रुक, झुरिच, ऑस्ट्रिया आणि विंटरथर, स्वित्झर्लंड या ठिकाणी अशा प्रकारचे अजब निदर्शने या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

सदर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एका निवेदनात दावा केला की, आठ देशातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी सुमारे 900 कार ज्या प्रदूषण करणाऱ्या होत्या, त्याचे टायर पंक्चर केले आहे.
सदर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एका निवेदनात दावा केला की, आठ देशातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी सुमारे 900 कार ज्या प्रदूषण करणाऱ्या होत्या, त्याचे टायर पंक्चर केले आहे.

कार्यकर्त्यांचा दावा - कार ही हवामानाला आपत्ती आणणारे
अनेक अहवालांनुसार, 'द टायर एक्टिंग्विशर' ने मार्च 2022 पासून सुमारे 10,000 चारचाकी वाहनांचे टायर पंक्टर केले आहेत. शहरांमध्ये दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत आहे, जे हवामानासाठी धोकादायक आहे.

कारचे टायर पंक्चर करण्याबाबत एका कार्यकर्त्याने सांगितले की, कार ही हवामानाला आपत्ती ठरत आहे. यामुळे जास्तीत जास्त वायू प्रदूषण होते. जे लोकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाला धोकादायक ठरत आहे. जगात असे अनेक लोक आहेत. ज्यांच्याकडे एक नव्हे अनेक कार आहेत. संपूर्ण जगासमोर हवामान बदल हे सर्वात मोठे आव्हान म्हणून समोर आले आहे. आम्हाला वाचवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता आपल्यालाच मदत करावी लागेल.

कार्यकर्त्यांनी गाड्यांवर एक पोस्टरही चिटकवले आहे. ज्यामध्ये टायर पंक्चर करण्याचे कारण लिहिले जात आहे.
कार्यकर्त्यांनी गाड्यांवर एक पोस्टरही चिटकवले आहे. ज्यामध्ये टायर पंक्चर करण्याचे कारण लिहिले जात आहे.

विमानाच्या रन-वे वर बसले कार्यकर्ते
जर्मनीतील ब्रँडनबर्ग विमानतळावर काही पर्यावरणप्रेमी धावपट्टीवर बसले होते. त्यांनी विमानासाठी असलेल्या ट्रॅकवर सायकल चालवली आणि तिथेच ठिय्या केला. या आंदोलकांमध्ये एका 70 वर्षीय वृद्धाचाही समावेश होता.

निदर्शने करण्यासाठी विमानतळावर दाखल झालेल्या या लोकांची मागणी होती की, प्रवासासाठी विमानांचा वापर बंद करण्यात यावा.
निदर्शने करण्यासाठी विमानतळावर दाखल झालेल्या या लोकांची मागणी होती की, प्रवासासाठी विमानांचा वापर बंद करण्यात यावा.

600 कोटींच्या पेंटिंगवर टोमॅटो सूप फेकण्यात आला
युरोपला हवामान बदलाचा फटका बसत आहे. त्यामुळे तेथे सातत्याने लोक वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत आहेत. जर्मनीच्या आधी लंडनमध्ये निदर्शने झाली. येथील नॅशनल गॅलरीत दोन आंदोलकांनी व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या पेंटिंगवर टोमॅटोचे सूप फेकले. सनफ्लॉवर नावाच्या या पेंटिंगची किंमत 600 कोटी रुपये होती.

लंडनमधील आंदोलकांनी तैलचित्रांच्या विरोधात व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या पेंटिंगवर टोमॅटो सूप फेकले.
लंडनमधील आंदोलकांनी तैलचित्रांच्या विरोधात व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या पेंटिंगवर टोमॅटो सूप फेकले.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे लोक त्रस्त

2022 मध्ये इंग्लंड आणि संपूर्ण युरोपमधील लोकांना उष्णतेचा त्रास होत होता. मुसळधार पावसामुळे पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतातील पहिल्या उष्णतेच्या लाटेमुळे पिकांचे नुकसान झाले. अमेरिकेतही कडक उन्हामुळे जंगलांना आग लागली, तर दुसरीकडे पावसामुळे पूर आला. या सगळ्यामागे हवामानातील बदल असल्याचे मानले.

बातम्या आणखी आहेत...