आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हवामान बदलासंबंधी होणाऱ्या ऑनलाइन संमेलनाचे पाकिस्तानला निमंत्रण दिलेले नाही. हे संमेलन २२ व २३ एप्रिल रोजी होईल. या वर्षाच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र हवामान बदल संमेलनाच्या (सीआेपी २६) आधी बायडेन यांचे विशेष दूत जॉन कॅरीदेखील याच मुद्द्यावर चर्चेसाठी भारत, बांगलादेश आणि यूएईचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पाकिस्तानचे नाव समाविष्ट नाही. अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला. याच मुद्द्यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी सोशल मीडियावर अमेरिकी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी पाकिस्तानात पर्यावरण संरक्षणासाठी होत असलेल्या कामांचा पाढा शनिवारी वाचून काढला.
इम्रान यांनी सोशल मीडियात तीन टिप्पण्या केल्या. पाकिस्तानला हवामानसंबंधी संमेलनाचे निमंत्रण न दिल्यावरून सुरू असलेल्या चर्चेने त्रस्त आहे. हवामान बदलातून निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी माझ्या सरकारने अनेक धोरणे तयार केली. भावी पिढ्यांच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही जागतिक समस्येची तीव्रता कमी करणे, स्वच्छ व हरित पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच ग्रीन पाकिस्तानसाठी पुढाकार, १० अब्ज वृक्षारोपण, नद्यांची स्वच्छता या क्षेत्रात गेल्या सात वर्षांत खूप काही अनुभव घेतला आहे. आमच्या धोरणांचे कौतुक झाले. त्याला मान्यताही मिळाली. आम्ही या क्षेत्रात कोणत्याही देशाची मदत करण्यास तयार आहोत.
आम्ही संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल संमेलन २०२१ साठी आधीपासूनच प्राधान्यक्रम निश्चित केला आहे, असे इम्रान यांनी सांगितले. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या म्हणण्यानुसार केरी यांनी पाकिस्तानला डावलल्याने देशात नाराजी आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने चीनशी सलगी करत भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न वारंवार केले. यासाठी पाकिस्तानला चीनची फूस आहे. चीनने पाकिस्तानला विकास कामांच्या नावाखाली मोठा निधी दिला आहे. काही भागात रस्त्यांसह इतर सुविधा तयार करून दिल्या. मात्र आता पाकला या गोष्टी जड जात आहेत.
बायडेन यांनी पाकिस्तान पंतप्रधानांना बोलणेही टाळले
बायडेन यांनी २० जानेवारीला अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांचे अद्यापही इम्रान खान यांच्याशी फोनवरून संभाषण झालेले नाही. वास्तविक अमेरिकेने पाकिस्तानसोबत हवामान बदलाच्या संकटाबाबत सोबत करण्यास तयार असल्याचे याच आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले होते. व्हाइट हाऊसने अलीकडेच जागतिक संमेलनासाठी नरेंद्र मोदींसह ४० नेत्यांना निमंत्रित केल्याचे जाहीर केले होते. पाकिस्तान सातत्याने आता जागतिक समस्यांबद्दल बोलत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.