आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महामारीदरम्यान ७३ टक्के अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. लाखो लोक घरात जणू कैद आहेत. विक्रमी बर्फवृष्टी व कडाक्याच्या थंडीमुळे अनेक लसीकरण केंद्रेही बंद पडली आहेत. टेक्सास, लुइसियाना, केंटुकी व मिसौरीत २३ जणांचा मृत्यू झाला. वीजव्यवस्था कोलमडल्याने १७ राज्यांतील ४३ लाख लोक अंधारात आहे. टेक्सासमधील परिस्थिती वाईट आहे. सुमारे २६ लाख लोकांना थंडीच्या काळात गैरव्यवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. बर्फवृष्टीमुळे १५० हून जास्त रस्ते ठप्प झाले .१००० हून जास्त विमान उड्डाणे रद्दे झाले.
१७ राज्यांतील ४३ लाख लोक अंधारात
संकटात वाढ : आर्क्टिक येथून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे अमेरिकेतील थंडीचा गारठा वाढला आहे. टेक्सासमध्ये १० लाख बॅरल तेल व १००० घनमीटर गॅस वाहिन्या गोठल्याने बंद पडल्या आहेत.
विक्रम : फेब्रुवारीत अमेरिकेचे तापमान १० ते १४ अंशादरम्यान आहे. परंतु यंदा १२२ वर्षांत पहिल्यांदाच तापमान उणे २६ अंशापर्यंत गेले. आठवड्याच्या शेवटी परिस्थितीत सुधारणा अपेक्षित आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.