आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलंबियात विमान कोसळले; 8 ठार:इंजिनमधील बिघाडामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती, मेडेलिन शहरात भीतीचे वातावरण

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबियातील एका निवासी भागात विमान कोसळले. या अपघातात विमानात असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला. कोलंबियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ​​​​​​मेडेलिन येथे ही घटना घडली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हे विमान कोसळले आहे.

छोटे विमान इमारतीला धडकले

कोलंबिया मेडेलिन शहरातील एका निवासी भागातील इमारतीला हे छोटे विमान धडकले. त्यामुळे इमारतीचा सर्वात वरचा मजला पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. सदर अपघाती विमान ट्विन-इंजिन पाईपर होते. जे मेडेलिन शहरातून चोको येथील पिझारो नगरपालिकेकडे जात होते.

अचानक अपघात, शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण
कोलंबियातील सर्वात मोठे दुसरे शहर म्हणून मेडेलिन शहराची ओळख आहे. येथील निवासी भागात सोमवारी सकाळी एक छोटे विमान इमारतीला धडकल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. या विमानात वैमानिकासह आठ जण बसलेले होते. या अपघातात विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला.

इंजिनमधील बिघाडामुळे घडला अपघात

सोमवारी सकाळी विमानाने 'ओलाया हेरेरा' विमानतळावरून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच इंजिनमधील बिघाडाची जाणीव पायलटला झाली. त्याने विमानतळ प्राधिकरणाकडे याबाबत माहिती दिली होती. मात्र, तो पायलट या अपघाताला टाळू शकला नाही.

8 जणांचा मृत्यू, परिसरात बचावकार्य

अपघातानंतर विमानतळ प्राधिकरणाने ट्विटवर सांगितले की, या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये (6 प्रवासी, आणि 2 कर्मचारी) यांचा समावेश होता. तर ज्या इमारतीवर हे विमान धडकले त्या ठिकाणचे लोक जखमी किंवा मृत्यू झाले की नाही याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...