आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीन:कोलंबिया यूनिव्हर्सिटीचा शोध- मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोरोनासाठी उपयोगाचे नाही

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेने कोरोनाच्या भीतीपोटी औषध जमा करणे सुरू केले, एफडीएने दिला इशारा
  • हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोणत्या रुग्णांना द्यावी, यावर डॉक्टर-शास्त्रज्ज्ञांचे एकमत नहीं

कोलंबिया यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कोरोना संक्रमण उपयोगी मानली जात असलेली आणि खासकरुन मलेरिया आजारात वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यूनिव्हर्सिटीने अंदाजे 1400 रुग्णांवर केलेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात येत आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या रुग्णांमध्ये काही फरक जाणवत नाहीये. है औषध गंभीर आजारी रुग्णांना वाचवण्यात उपयोगी पडत नाहीये. ही रिपोर्ट न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये छापण्यात आली आहे.

या अभ्यासात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या त्या सल्ल्यावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे, ज्यात त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मात्रा वाढवण्यावर जोर दिला होता. अमेरिकी सरकारने 19 मार्चला मलेरियाच्या उपचारात उपयोगी येणारी क्लोरोक्वीनला कोरोनासाठी वापरण्यास मंजुरी दिली होती.

1400 रुग्णांवर केला अभ्यास

कोलंबिया यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेणाऱ्या 800 पेक्षा जास्त रुग्णांची तुलना 560 अशा रुग्णांसोबत केली, जे है औषध घेत नाहीत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेणाऱ्या रुग्णांपैकी काहींना फक्त हेच औषध मिळाले तर काहींना एजिथ्रोमायसिन सोबत मिळून देण्यात आले.

या दोन्ही समुहांच्या वेगवेगळ्या परिक्षणातून समोर आले की, 1400 रुग्णांपैकी 232 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 181 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. दोन्ही समुहामध्ये ही आकडेवारी बरोबर होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापरामुळे मरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही.

या अभ्यासाला अमेरिकेतील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थक़ून फंडिंग मिळाली होती. एप्रिलमध्ये सुरू झालेल्या या अभ्यासाचा हेतू हा होता की, औषध व्हायरसच्या संपर्कात आलेल्या फ्रंटलाइन वर्कर्समध्ये संक्रमण रोखण्यास मदत करू शकते, का नाही.

औषधाचा फायदा कमी आणि नुकसान जास्त

अचानक जीवन रक्षक बनुन समोर आलेली हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनबाबत यात अमेरिकी संशोधकांचा दावा आहे की, या औषधामुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त होत आहे. त्यांनी याचे संभाव्य वाइट परिणाम सांगितले आहेत, जाय्ता ह्रदयाचे ठोके अचानक वाढणे आणि मृत्यू होने आहे.

एफडीएने या औपचारिक अभ्यासाशिवाय कोरोनो व्हायरस संक्रमणासाठी या औषधाच्या वापरावर इशारा दिला आहे. त्यांनी हा इशारा तेव्हा दिला आहे, जेव्हा अमेरीका या औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात करत आहे.

गंभीर रुग्णांन दिले जात आहे औषध

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध गंभीर आजारी रुग्णां दिली जात आहे. यासाठी जगभरात आमलात येणाऱ्या विविध पद्धतीचा वापर होत आहे. परंतू, चांगले परिणाम मिळत नाहीयेत. याचा वापर रुग्णांना रुग्णालयात भरती केल्याच्या दोन दिवसातच सुरू झाला. पण, काही जानकारांचे म्हणने आहे की, रुग्ण जास्त गंभीर नसल्यासच या औषधाचा परिणाम पडतो, गंभीर आजारी रुग्णांवर याचा खास परिणाम होत नाही.

भारतीय औषधाच्या गुणवत्तेवर प्रश्न

अमेरिकी शास्त्रज्ज्ञ डॉ. रिक ब्राइटने देशाच्या विशेष काउंसिल ऑफिसमध्ये भारतातून येणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गुणवत्तेबाबत तक्रार केली होती. यात सांगण्यात होते की, ट्रम्प सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांना भारताकडून मिळणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन बाबात इशारा देण्यात आला होता. डॉ. ब्राइट यांना सध्या त्यांच्या पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. यापूर्वी ते बायोमेडिकल अॅडवांस्ड रिसर्च डेवलपमेंट अथॉरिटीचे प्रमुख होते. 

बातम्या आणखी आहेत...