आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:किशाेरवयीन मुलांशी माेकळेपणाने संवाद साधा, पसंतीच्या काैशल्याशी जाेडल्यास शाळेत उत्साह कायम राहील : तज्ज्ञ

वाॅशिंग्टन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणी मुले शाळेबद्दल खूप उत्साही असतात. परंतु किशाेरावस्थेत येताच त्यांचा आनंद जणू हरवताे. तक्रारीची यादी केल्यास त्यात सर्वात वर शाळेचा मुद्दा असेल. पण मित्रांसाेबत राहणे, आवडत्या शिक्षकांसाेबत वेळ घालवणे या वयाेगटातील मुलांना पसंत असते आणि शाळेला जाण्याचे माेठे कारणही तेच असते. वास्तवात किशाेरावस्थेत शाळेबद्दल आवड नसते. अशा मुलांना स्वातंत्र्य हवे असते. या समस्येवर दीर्घकाळ काम करणाऱ्या क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट लिजा डॅमाेर यांनी किशाेरवयीन मुलांना सदाेदित उत्साही कसे ठेवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

१. आवड वाढवा : किशाेरवयीन मुले खुलेपणा राहावी यासाठी पालकांनी त्यांना प्राेत्साहन द्यावे. खरे तर या वयोगटातील मुलांचेही स्वत:चे प्राधान्यक्रम ठरलेले असतात. त्यांची मते आपण स्वीकारवीत. मग ते खुलतात. त्यातून त्यांना उत्साही ठेवण्यास मदत हाेऊ शकते. म्हणूनच त्यांच्या आवडींना प्राेत्साहन द्या. शाळेत किंवा शाळेबाहेर काैशल्य वाढीसाठी मदत करावी. अशा आवडीसाठी एखादा वर्ग किंवा संधी शाेधावी. व्यक्तिगत उद्दिष्टातून त्यांना सतत प्रेरणा मिळू शकते.

२. दबाव आणू नका : काळासाेबत आपले प्राधान्यक्रम बदलतात. म्हणूनच किशाेरवयीन मुलांवर एखाद्या गाेष्टीसाठी दबाव टाकू नका. डॅमाेर म्हणाल्या, त्यांना हायस्कूलमध्ये इतिहास आवडत नव्हता. पण आता राेज रात्री वाचते. कदाचित आता न आवडणारी बाब नंतर अावडते. किशोरवयीन मुलांची भटकंती, वीकेंड यांना व्यर्थ समजू नका.

३. व्यावसायिकाची मदत घ्या : शालेय समुपदेशक किंवा मानसिक व्यावसायिकाची मदत घ्या. निराेगी किशाेरवयीन मूल आपल्या उद्दिष्टावर केंद्रित हाेऊ शकते. प्रत्येक विषयाची आवड ठेवावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नका. असाइनमेंट, अभ्यासक्रमात सर्वाेत्कृष्ट हाेण्याची अपेक्षा ठेवू नका, अन्यथा शिकण्याची प्रक्रिया त्यांच्यासाठी तणावाची ठरेल. त्यांच्या आवडीच्या विषयासाठी त्यांना प्राेत्साहन द्या. परंतु झाेप, मनाेरंजनही महत्त्वाचे ठरते. त्याच्याशी तडजाेड नकाे.

बातम्या आणखी आहेत...