आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Companies Can Accurately Gauge Your Mood, Personality And Emotions From Your Voice; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:तुमच्या आवाजावरून तुमचा मूड, व्यक्तिमत्त्व आणि भावनांचा अचूकअंदाज घेतील कंपन्या, हा डाटा त्यांच्यासाठी कमाईचा नवा मार्ग उघडेल

न्यूयॉर्क4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पुढची पातळी, पण गोपनीयतेवर अनेक प्रश्नचिन्हे

तुम्ही जेव्हा एखादी माहिती किंवा तक्रारीसाठी कंपनीच्या कॉल सेंटरशी बोलता तेव्हा कॉल सेंटरचे कर्मचारी तुम्हाला सांगतात, हा कॉल प्रशिक्षण आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या उद्देशाने रेकॉर्ड केला जात आहे. पण वास्तव असे आहे की, तुमच्या आवाजाद्वारे कंपन्या भविष्यात नफा कमावू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पुढील पातळीवर पोहोचवण्यातही या कृतीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कॉल सेंटरच नव्हे तर स्मार्ट स्पीकर आणि स्मार्टफोनसारखे डिव्हाइसही तुमचा आवाज आणि त्यातील चढ-उतार टिपण्यास सज्ज झालेले आहेत. भविष्यात तुमचा आवाजही तुमची बायोमेट्रिक ओळख बनू शकते.

वैयक्तिक विक्रीशी निगडित व्यवसायात असलेले काही मोठे ब्रँडही या दिशेने काम करत आहेत. ते तुमच्या आवाजाच्या माध्यमातून भावना कशा ओळखाव्यात आणि त्यानुसार कसे डील करावे, याचा अभ्यास करतील. उदाहरणार्थ : तुम्ही एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जागा आरक्षित करण्यासाठी फोन करता. तेव्हा त्यांचे व्हाॅइस अॅनालिसिस सिस्टिम तुमच्या आवाजावरून तुम्ही त्यांच्या हॉटेलमध्ये डिनर करण्याच्या श्रेणीत बसत नाही, असा निष्कर्ष देते. त्यामुळे तुमची विनंती संबंधितांकडून फेटाळली जाते किंवा एखादी शाळा विद्यार्थ्याला स्पेशल कोर्ससाठी प्रवेश नाकारते.

कारण व्हाॅइस अॅनालिसिसमध्ये त्यांना संबंधित विद्यार्थी त्या विषयाप्रति गंभीर नसल्याचे समजते. तुम्ही अधिक खर्च करणारे आहात, असे कंपनीच्या रेकॉर्डमध्ये असाल आणि कस्टमर एजंटशी बोलताना हे बायोमेट्रिक तंत्रज्ञान तुम्ही तणावग्रस्त असल्याचे दाखवत असेल तर कदाचित तुम्हाला खरेदीवर अतिरिक्त डिस्काउंटही दिले जाऊ शकते. लवकरच कंपन्या तुमच्या आवाजाच्या माध्यमातून तुमचे वजन, उंची, वय, वर्ण अशा गोष्टी जाणून घेण्यातही सक्षम होतील.

गुगलचे नवे तंत्रज्ञान वय आणि लिंगाचाही अंदाज घेऊ शकते
व्हाॅइस सिग्नेचरच्या आधारे पेटंट केले गेलेले गुगल सर्किटरी वय आणि लिंगाचा अंदाज घेते. आईवडील आपल्या मुलांच्या हालचालींवरील नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतील. अॅमेझॉनने दावा केला की त्यांचा हेलो रिस्ट बँड दुसऱ्यांशी बोलत असताना तुमची भावनात्मक स्थिती ओळखू शकतो. अनेक हॉटेल्सनी आपल्या रुममध्ये अॅमेझॉन आणि गुगलचे डिव्हाइस लावले आहेत. कन्स्ट्रक्शन कंपन्यासुद्धा नवीन प्रकल्पांच्या भिंतीमध्ये अॅमेझॉन, अलेक्सा आणि गुगल असिस्टंट लावत आहेत. तथापि, या सर्व उपायांमुळे अनेक सामाजिक आणि वैयक्तिक गोपनीयतेशी निगडित अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...