आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:फेसबुक, टि्वटर, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या मुलांच्या संगोपनासाठी देताहेत 8 ते 10 आठवड्यांची जादा सुटी

दाइसुके वाकाबयाशी/शीरा फ्रेंकेल | न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे बालसंगोपन केंद्र बंद पडल्याने टेक कंपन्यांची कर्मचाऱ्यांना मदत

अमेरिकेत कोरोना संकटामुळे शाळा व मुलांची काळजी घेणारी केंद्रे बंद झाली आहेत. यामुळे पालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना कामासोबतच मुलांची काळजी घ्यावी लागत आहे. यामुळे त्यांचे खासगी आयुष्य आणि कार्यालयाच्या कामावर परिणाम होत होता. ही स्थिती बघून मायक्रोसाॅफ्ट, ट्विटर, फेसबुकसह अनेक टेक कंपन्यांनी मुले असलेल्या कर्मचाऱ्यांना मदत केली आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी कंपनी त्यांना ६ ते १० आठवड्यांपर्यंतची सुटी देत आहे. त्यांना वेतनही पूर्ण मिळत आहे, तर अविवाहित किंवा मुले नसलेले कर्मचारी कंपन्यांच्या या धोरणाला भेदभावपूर्ण म्हणताहेत. फेसबुकच्या एका बैठकीत पालकांना फायदा देणाऱ्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. ट्विटरमध्येही वाद झाला आहे. जादा सुट्यांबाबतचे वाद त्या कंपन्यांमध्ये दिसून आले आहेत, जेथे तरुण कर्मचारी जास्त आहेत. त्यांना खूप कामाच्या मोबदल्यात चांगले वेतन आणि सुविधांची आशा आहे.

महामारी पसरताच सर्वात आधी टेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. मुले घरीच राहिली तर त्यांची काळजी कोण घेईल, असे कंपनीला वाटले. मार्चमध्ये फेसबुकने मुले आणि आजारी नातेवाइकांच्या देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांना १० आठवड्यांची वेतनासह सुटी दिली. गुगल व मायक्रोसाॅफ्टनेही हेच केले. फेेसबुक प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले, कंपनी २०२० च्या पहिल्या सहा महिन्यांच्या कामगिरीच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करणार नाही. ट्विटरमध्येही हाच वाद झाला. तेथे कर्मचाऱ्यांच्या सुटीची सवलत जास्त आहे. तर मुले असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, जास्त सुट्यांना विरोध करणाऱ्या लोकांना समजणार नाही की, काम आणि मुलांमध्ये समतोल साधणे सोपे नाही. बालसंगोपन केंद्रे बंद असल्याने अनेक अडचणी आल्या. मुलांना घरी शिकवावेही लागते.

आम्हाला पालकांसारखी सुविधा का नाही?- मुले नसणाऱ्यांचा सवाल

फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने लिहिले, हे चुकीचे आहे की, मुले नसणाऱ्यांना अशी सुविधा नाही, जशी पालक कर्मचाऱ्यांनाच दिली आहे. यावर मुले असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने लिहिले, आम्ही पालकांना लाभ देण्याच्या प्रश्नाशी सहमत नाही.

बातम्या आणखी आहेत...