आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Companies Should Give Employees The Option Of Working Four Days A Week For Work life Balance!; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरी-जीवनात संतुलनासाठीआठवड्यातील चार दिवसांच्या कामाचा पर्याय द्यावा!

टोकीयोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशा...जास्त सुट्या मिळाल्याने लोक परस्परांच्या भेटीगाठी घेतील, विवाह समारंभांना वाव
  • जपान सरकारचा सल्ला - कार्यालयात कमी वेळ राहण्यासाठी प्रोत्साहन

जपान सरकारने कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी ५ एेवजी ४ दिवसांच्या कामाचा पर्याय दिला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार चार दिवस निवडीचा अधिकार असावा. लाेकांनी नाेकरी, कुटुंबाची जबाबदारी व नवीन काैशल्य विकास यात त्यांना ताळमेळ ठेवता यावा या उद्देशाने सरकारने मार्गदर्शक तत्त्व देखील तयार केले आहे. सरकारच्या या आर्थिक धाेरणासंबंधी प्रस्तावावर देशात चर्चेला सुरुवात झाली आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होऊ शकते.

1. अर्थव्यवस्था सुधारण्याची आशा
जास्तीच्या सुट्या मिळाल्यानंतर लाेक बाहेर पडतील. खर्चही करतील. त्यातून अर्थव्यवस्थेला आधार मिळेल. सुटी मिळाल्यावर तरुण जाेडपी बाहेर पडतील. परस्परांची भेट घेतील. विवाहाला प्राेत्साहन मिळेल. घटणाऱ्या जन्मदराच्या समस्येतून जपानला बाहेर पडता येऊ शकेल. सरकारला त्यातून बाहेर पडायचे आहे. संशाेधक फर्म फुजित्सुचे अर्थशास्त्रज्ञ मार्टिन शुल्त्स म्हणाले, या परिवर्तनासाठी सरकार गंभीर आहे.

2. कोरोशीपासून वाचण्याचे प्रयत्न
जपानमध्ये सामान्यपणे अतिश्रम करून लाेक आजारी पडल्याच्या किंवा तणाव वाढल्याने कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडतात. जपानी भाषेत त्याला एक शब्द आहे-कारोशी. म्हणजेच अतिश्रमाने मृत्यू हाेणे हाेय. गेल्या एक वर्षात कार्यालयात पाच दिवस किंवा उशिरा रात्रीपर्यंत थांबण्याची गरज नाही, हे लाेकांंनी दाखवून दिले आहे, असे शुल्त्स यांनी सांगितले.त्यात अनेक गोष्टी सोयीच्या आहेत.

3.त्रुटी, उत्पन्नाला फटका
काही अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या याेजनेत त्रुटी आहेत. जपानमध्ये अगाेदरच कामगारांचा तुटवडा आहे. त्याशिवाय कमी दिवस काम केल्याने उत्पन्नात देखील घट हाेईल, अशी चिंता कर्मचाऱ्यांना वाटत आहे. शिक्षण घेत असलेल्या जुंकाेला अनेक कंपन्यांनी नाेकरीची आॅफर दिली आहे. परंतु त्यांनी एका छाेट्या कंपनीची निवड केली आहे. माेठ्या कंपन्यांत काम व जीवनाचे संतुलन बिघडते.

4. नवनवीन पद्धती स्वीकारल्या
मार्टिन शुल्त्स म्हणाले, महामारीदरम्यान कंपन्यांनी काम करण्याच्या नवनवीन पद्धती स्वीकारल्या. कंपन्या कर्मचाऱ्यांना घरांतून, कार्यालयापासून दूर ठिकाणाहून किंवा ग्राहकाजवळून काम करण्यास सांगू लागल्या आहेत. ही बाब कर्मचाऱ्यांसाठी आरामदायक व उत्पादकता वाढवणारी आहे. जपानच्या काही कंपन्यांनी याेजनेचा लाभ घेतला. कंपन्या कार्यालयातील कर्मचारी संख्या कमी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...