आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:विमानाचे वजन कमी करण्यासाठी कंपन्यांचा डिजिटल साधनांकडे मोर्चा; कुणी मासिके केली बंद, तर कुणी फोनवरून घेताहेत पदार्थांच्या आॅर्डर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाकाळात खर्च कमी करण्याबरोबरच संसर्ग रोखण्याची दुहेरी जबाबदारी

रागिणी सक्सेना
कोरोनाकाळात जगभरात विमान कंपन्यांचा कारभार मर्यादित किंवा बंद झाला आहे. तशात उड्डयन उद्योगावरही खर्च घटवण्यासह संसर्गाचा धोका कमी करण्याची जबाबदारी आहे. अनेक कंपन्यांनी डिजिटल व्यवहार सुरू केले आहेत. यातून लोकांमधील आपसातील संपर्क कमी होण्याबरोबरच कंपन्यांचा खर्च व विमानांचे वजन घटवण्यातही यश आले आहे. कंपन्या आपल्या पातळीवर खर्च कमी करण्याचे उपाय करत आहेत. विशेष म्हणजे विमानात जेवढे कमी वजन असेल तेवढाच लँडिंग आणि टेकआॅफमध्ये इंधनाचा वापर कमी होतो.

सिंगापूर एअरलाइन्सने डिजिटल इनफ्लाइट सिस्टिम ‘स्कूट हब’ सुरू केले आहे. यात प्रवासी मोबाइल फोनद्वारे अन्नपदार्थांची ऑर्डर देणे, शुल्कमुक्त वस्तू आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामुळे वार्षिक १५६ मेट्रिक टन कागदाची बचत होईल आणि कार्बन उत्सर्जनातही ४१ टनांची घट होईल. दरवर्षी १३ टन इंधनाची बचत होईल. ब्रिटिश एअरवेजने विमानात दिली जाणारे मॅगझिन ‘हाय लाइफ’ बंद केले आहे. ते आता प्रवाशांना ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहे. अमेरिकन एअरलाइन्सने कोशिंबिरीच्या प्लेटमधून केवळ ऑलिव्ह कमी करून वार्षिक ३० लाख रुपये वाचवले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने आता विमान कंपन्यांसाठी इनफ्लाइट मेन्यू, मासिके आणि मनोरंजनाची साधने हटवणे सोपे केले आहे. त्यांचे वजन ६ किलोपर्यंत असते. ऑनबोर्ड रिटेलऐवजी जमिनीवर उतरल्यानंतर इनफ्लाइट खरेदीच्या डिलिव्हरीसाठी ई- कॉमर्स अॅप आणि कुरिअरचा वापर करून विमान कंपन्या वजन कमी करत आहेत. फिनएअर प्लास्टिक कटलरी हटवून वार्षिक २५ लाख रुपये वाचवत आहे.

भारतातही एअरलाइन्सने टाकली पावले, आता वेब चेकइन पद्धत
दरम्यान, भारतात जवळपास सर्वच विमान कंपन्या अशीच पावले टाकून तोटा कमी करत आहेत. इंडिगो आणि विस्तारा एअरलाइन्समध्ये बोर्डिंग पासऐवजी वेब चेकइन सुरू करण्यात आले आहे. फ्लाइट मॅगझिन बंद केली असून ऑर्डरही अॅपवरून घेतल्या जात आहेत. तसेच एअर सिकनेस बॅगची संख्याही कमी केली जात आहे. विमानात आधीच ऑर्डर केलेले अन्न व शीतपेये ठेवली जात आहेत. उड्डयन तज्ज्ञ वासुदेवन एस. यांचे म्हणणे आहे की, कोविड- १९ ने विमान कंपन्यांना खर्च कमी करण्याचे मार्ग शोधण्याचे व स्पर्शविरहित तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज निर्माण केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser