आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Companies Were Going To Put Chips In The Hands Of Employees So That Gates Should Not Be Opened Without Permission, Computers Should Not Be Started; Strong Opposition In America

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:विनापरवानगी गेट उघडू नये, कॉम्प्युटर सुरू होऊ नये म्हणून कंपन्या लावणार होत्या कर्मचाऱ्यांच्या हातात चिप; अमेरिकेत जोरदार विरोध

कॅलिफोर्निया10 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मायक्रो चिपमध्ये वैद्यकीय, बँक डेटासह पासपोर्टपर्यंत सर्व असते माहिती
  • अमेरिकेत कायदा करण्यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार

अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील संसदेत एक विधेयक पारित करण्यात आले आहे. यानुसार कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या शरीरात मायक्रो चिप लावण्यास बंधन घालू शकणार नाहीत. २०१७ मध्ये कंपन्यांनी एक धोरण आखले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या शरीरात आरएफआयडी मायक्रो चिप लावल्या जाणार होत्या. या चिपमुळे ऑफिसमध्ये प्रवेश करताच गेट, दरवाजे आपोआप उघडले जाणार होते, कॉम्प्युटर सुरू होणार होते. एवढेच नव्हे तर कँटीनमध्ये नाष्ट्याची बिलेही परस्पर दिली जाणार होती. विशेषत: या चिपच्या माध्यमातून कंपन्या कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकणार होत्या. अर्थात, कंपन्यांचे हे धोरण कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने स्वीकारायचे होते. मात्र, यात कंपन्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणून ही चिप लावण्यास बाध्य करू शकतील ही भीती होती. हे विधेयक पारित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना यासाठी बंधन घालणे बेकायदा ठरेल. मायक्रो चिप प्रोटेक्शन नामक या विधेयकानुसार, कर्मचाऱ्याची इच्छा असेल तर तो ही चिप इम्प्लांट करू शकतो. दरम्यान, हे विधेयक पारित झाले तरी याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी अमेरिकी सिनेटमध्येही याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. याची तयारी आता सुरू झाली आहे. कॅलिफोर्निया, अरकन्सास, मिसोरीसह १० राज्यांनी अगोदरच हे विधेयक पारित केले आहे.

विधेयक मांडणारे मिशिगन संसदेचे प्रतिनिधी ब्रोना कॉल यांना हे तंत्रज्ञान वापरले तर कर्मचाऱ्यांच्या खासगी जीवनहक्कांचे उल्लंघन होईल असे वाटते. दुसरीकडे या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी कंपनी एम-३२ चे सीईओ टॉड वेस्टबीनुसार, आगामी काळात चीनमध्ये अशा कर्मचाऱ्यांना बिझनेस कार्ड, वैद्यकीय माहिती व बँकांची माहितीही सेव्ह ठेवता येईल. हे लोक सार्वजनिक वाहतुकीचा पास, एटीएम कार्ड व पासपोर्ट म्हणूनही याचा वापर करू शकतील.

एका तांदळाएवढी मायक्रो चिप, किंमत सुमारे २३ हजार रुपये

एका तांदळाएवढ्या या मायक्रोचिपची किंमत २३ हजार रुपये आहे. ती हातावर शस्त्रक्रिया करून कुठेही लावता येऊ शकते. ही चिप लावल्यानंतर हाताच्या इशाऱ्यावर दरवाजे, व्हेंडिंग मशीन, कॉम्प्युटर इत्यादी काम करतील. याचा वापर करून कंपन्यांनाही कर्मचारी नेमका कुठे गेला व काय काम केले हेही कळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...