आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:डेमोक्रॅटच्या तुलनेत डोनाल्ड ट्रम्प डिजिटल प्रचारावर 4 दिवसांत 75 कोटी खर्च करणार

न्यूयॉर्कहून भास्करसाठी मोहम्मद अलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारपद्धतीत बदल

कोरोना संकटामुळे अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार पद्धतीत बदल झाले आहेत. रॅली, निधी गोळा करण्यासाठी सभा आणि निवडणुकीतील मुद्द्यांवरील चर्चेसारखे कार्यक्रम जवळपास रद्द झाले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी आतापर्यंत एकही सभा घेतलेली नाही. यापूर्वी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑगस्टच्या मध्यात पक्षाचे कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी पोहोचलेले असायचे. मात्र या वर्षी स्थिती बदलली आहे. निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या प्रचारसभा महत्त्वाच्या असतात. याद्वारे पक्षांकडून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातात. या वर्षी डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय संमेलन एप्रिलमध्ये होणार होते. हे वाढवून जुलै आणि नंतर १७ ऑगस्ट करावे लागले. यापूर्वी आपल्या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोक पोहोचायला हवे, असे ट्रम्प सांगत होते. यामुळे कोरोनाची भीती कमी होईल असे त्यांचे मत होते. मात्र फ्लोरिडातील संमेलन ट्रम्प यांना रद्द करावे लागले. तेे चारलोटमधील संमेलनातही सहभागी होणार नाहीत. एवढेच नाही तर ट्रम्प ‌‌वॉशिंग्टन डीसीतील अँड्रयू मेलन ऑडिटोरियममध्ये उमेदवारी स्वीकारतील. मात्र भाषण व्हाइट हाऊसमधूनच करतील. चारलोट संमेलनामध्ये पक्षाचे ४०० प्रतिनिधी सहभागी होतील. या वेळी प्रत्यक्ष रॅली, घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या प्रचाराऐवजी डिजिटल प्रचाराला प्राधान्य दिले जाईल.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनाविरोधात मोठे डिजिटल अभियान राबवण्याची तयारी सुरू केली आहे. डेमोक्रॅटचे हे संमेलन सोमवारपासून सुरू झाले आहे. हे गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे. मंगळवारपासून ट्रम्प यांच्या समर्थनार्थ यूट्यूबवर सलग ९६ तास प्रचार केला जाईल. याशिवाय अनेक मोठ्या वेबसाइट्स आणि न्यूज आऊटलेट‌्सवरही मोहीम राबविली जाईल. तर दुसरीकडे बायडेन प्रचारासाठी टेलिव्हिजन व रेडिओसारख्या पारंपरिक माध्यमांचा उपयोग करत आहेत. जाहिरात कंपनी अॅडव्हर्टायझिंग अॅनॅलिटिक्सनुसार बायडेन यांनी ८ ऑगस्ट ते १४ ऑगस्टपर्यंत प्रचारावर १११ कोटी रुपये तर ट्रम्प यांनी ५३ कोटी खर्च केले आहेत.

भारतीयता : मंत्रोच्चार, प्रार्थनेसह डेमोक्रॅटिकचे संमेलन सुरू

डेमोक्रॅटिक पक्षाच्या चारदिवसीय राष्ट्रीय संमेलनाची सुरुवात सर्वधर्मीय प्रार्थनासभा, वेद-महाभारतातील श्लोक आणि शीख धर्माच्या प्रार्थनेने झाली. टेक्सासमध्ये चिन्मय मिशनच्या एक अनुयायाने मंत्रोच्चार केला. व्हिस्कॉन्सिन गुरुद्वाराशी संबंधित एक शीख समुदायाच्या नेत्याने प्रार्थना केली. या संमेलनात बायडेन यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार तर भारतवंशीय कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले जाईल. यापूर्वी बायडेन फॉर प्रेसिडेंट अभियानासाठी रविवारी सर्वधर्म प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. यात बायडेन आणि हॅरिस यांच्यासाठी महाभारतातील ‘यतो कृष्ण ततो धर्म, यतो धर्म ततो जय।’ या ओळींचे वाचन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...