आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:अमेरिकेमध्ये महामारीमुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कोलमडल्याने चिंता; लसीकरणाचा वेग कमी असलेल्या राज्यांतील परिस्थिती वाईट

न्यूयॉर्क4 महिन्यांपूर्वीलेखक: मोहम्मद अली
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कोलमडू लागली आहे. लसीकरणाचा वेग कमी असलेल्या राज्यांत हे चित्र आहे. राज्यांतील आयसीयूमधील गर्दी वाढली आहे. ऑक्सिजनची व्यवस्था करणे रुग्णालयांसाठी अडचणीचे ठरले आहे. शवागारातही गर्दी वाढली आहे. अमेरिकेतील एक मोठा गट लस घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहे. फ्लोरिडा, दक्षिण कॅरोलिना, टेक्सास, लुइसियानामध्ये रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली आहे. फ्लोरिडाच्या ६८ रुग्णालयांत ऑक्सिजनची उपलब्धता खूप कमी आहे. या राज्यांत चिकित्सा सुविधा व निर्माण संचालक डोना क्रॅस दैनिक भास्करला म्हणाले, ही गंभीर स्थिती आहे. रुग्णालयांना राखीव ऑक्सिजनचा साठाही वापरावा लागत आहे. आम्ही अशी परिस्थिती कधीही पाहिलेली नाही. केंटकी व टेक्सासमध्येही अशीच चिंताजनक परिस्थिती आहे.

कोविड रुग्णालयांत बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. या काळात बाधित मुलांची संख्या वाढली आहे. इडाहोमध्ये रुग्णालयांनी एक घोषणा केली आहे. त्यात देखभालीसंबंधी संकटामुळे साधनांबद्दलचे नियम लागू आहेत. त्यानुसार आयसीयूच्या खाटा, व्हेंटिलेटर, पूरक ऑक्सिजन इत्यादी मर्यादित साधनांपासून लोक वंचित राहू शकतात. फ्लोरिडामधील डॉक्टर अहमद एलहद्दाद दैनिक भास्करला म्हणाले, लोकांची वेदना पाहवत नाही. आम्हाला हतबलता वाटत आहे. कारण लोक लस घेत नाहीत. ते म्हणाले, डेल्टा व्हेरिएंट लोकांच्या फुप्फुसावर हल्ला करत आहे.

आम्ही डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांना मृत्यूच्या दरीत जात असताना पाहत आहोत. प्रत्येक लाटेत ३०, ४०, ५० या वयोगटातील लोकांचा मृत्यू होत आहे. त्यांना ऑक्सिजनची गरज आहे. मागील लाटेच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. महामारी घातक असूनही लोक त्याला गांभीर्याने घेत नाहीत. अर्कान्सस, लुइसियाना, हवाई, मिसिसिपी व ऑरेगनमध्ये पूर्वीच रुग्ण भरतीचे विक्रम पाहायला मिळत आहेत. फ्लोरिडोत देशात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानुसार एक लाख नागरिकांच्या मागे ७५ बाधित रुग्णालयात दाखल होत आहेत. शुक्रवारी प्रतिदिवशी १ लाख लोकांमागे ६९०.५ नवे रुग्ण आढळल

मरेन पण लस घेणार नाही, एका मोठ्या समुदायाचा लसीला विरोध
मिशिगनमध्ये एक डॉक्टर म्हणाले, काही रुग्णांनी उपचारांसाठी मनाई केली आहे आणि लसीकरण कार्यक्रमावर टीका केली. मिशिगनच्या ब्यूमोंट हेल्थ रुग्णालयात डॉक्टर मॅथ्यू ट्रुन्स्की म्हणाले, ‘तुम्ही चुकीचे डॉक्टर आहात. मला कोविड नाही. मी मरेन परंतु कोविडची लस घेणार नाही.’ मॅथ्यू म्हणाले, १०० हून जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. १० पैकी ९ सीआेडीआयडी रुग्णांचे लसीकरण झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...