आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याची ऐशीतैशी:अमेरिकेत मुलांकडे सर्रास असेम्बल बंदूक, बंदूक संस्कृती वाढल्याने चिंता

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत बंदूक संस्कृतीमुळे समाजात हिंसाचार वाढत आहे. त्यावर अद्यापही नियंत्रण नाही. बंदूक खरेदी करण्यासाठी परवान्याची कवायत करावी लागते. परंतु अमेरिकेच्या कायद्यानुसार बंदुकीचे सुटे भाग विना परवाना खरेदी करता येतात. मग हेच सुटे भाग जाेडून बिनबाेभाट बंदूक वापरली जाते. गुन्हेगारांनी शाेधलेल्या कायद्यातील या पळवाटेने लहान मुलेही जात आहेत. लहान मुले देखील बंदुकीच्या सुट्या भागांची आॅनलाइन आॅर्डर देऊ लागली आहेत. वेगवेगळ्या सुट्या भागांमुळे त्याचा अनुक्रमांकही नसताे. त्यामुळे बंदुकीचा मालक काेण हे समजू शकत नाही. अशा प्रकारे अॅसेम्बल करून वापरल्या जाणाऱ्या बंदुकांना घाेस्ट गन असे संबाेधले जाते. म्हणजेच अशा बंदुकीला काेणत्याही प्रकारे ट्रॅक केले जाऊ शकत नाही. कॅलिफाॅर्नियाचे पाेलिस पाॅल फिलिप्स म्हणाले, गेल्या १८ महिन्यांच्या काळात घाेस्ट गनची संख्या खूप वाढली आहे. हिंसाचाराच्या घटनांत पन्नास टक्के बेकायदा शस्त्रे आढळून येतात.

पाेलिसांनी अशा बेकायदा २५ हजार बंदुकांना जप्त केले आहे. गुन्हेगारांना बंदुकीचा परवाना देऊ नये असा अमेरिकेत कायदा आहे. परंतु सुट्या भागांची आॅनलाइन आॅर्डर काेणीही देऊ शकताे. अशा प्रकारे तयार केल्या जाणाऱ्या बंदुकांना श्रेणीमध्ये समाविष्ट केले जात नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन यांनी निवडणूक प्रचार काळात या प्रश्नी ताेडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले हाेते. आॅनलाइन सुट्या भागांची खरेदी मात्र थांबू शकलेली नाही. आेबामा यांच्या काळातही बंदूक खरेदी थांबलेली नव्हती. काही वर्षांत सार्वजनिक हिंसाचारही त्यामुळे वाढला आहे.

१२ वर्षीय मॅक्सची अशीच हत्या, पुरावा शिल्लक नाही
कॅलिफाेर्नियात राहणाऱ्या सातव्या वर्गातील मॅक्सची जुलैमध्ये अशाच अॅसेम्बल बंदुकीने हत्या झाली हाेती. पाेलिसांनी घटनास्थळाहून घाेस्ट गन ताब्यात घेतली हाेती. या बंदुकीवर काहीही क्रमांक नसल्याचे दिसून आले हाेते. मॅक्सच्या मृत्यूनंतर अमेरिकेत घाेस्ट गनवर निर्बंध आणण्यासाठी चर्चेला सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...