आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानात तालिबानी शासन सुरू होताच त्याने रंग दाखवण्यास सुरूवात केली. जगभरात शिक्षण हा मानवी हक्क मानला गेला. परंतु तालिबान अफगाणच्या मुलींवर शिक्षण जणू ‘उपकार’ स्वरूपात देऊ करत आहे. रविवारी तालिबानने मुलींच्या उच्च शिक्षणासाठी परवानगी तर दिली, परंतु साेबत अनेक अटी-शर्तीही थाेपल्या. तालिबान सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बकी हक्कानी म्हणाले, मुली पदवी व पदव्युत्तर पदवीसह सर्व पातळीवरील विद्यापीठात अध्ययन करू शकतात.
परंतु आम्ही मुले-मुलींना एकत्र शिक्षण घेण्याची परवानगी देणार नाहीत. म्हणूनच मुला-मुलींचे वर्ग स्वतंत्र असतील. मुलींना इस्लामी पोषाख परिधान करणे अनिवार्य आहे. हक्कानी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत तालिबान २० वर्षांपूर्वीच्या काळात जाऊ इच्छित नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही आजच्या काळात सद्यस्थितीचा विचार करून देशाची उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आमचा लिंगभेदावर विश्वास आहे. देशात शिकवल्या जाणाऱ्या विद्यापीठ स्तरीय विषयांचा आढावा होईल. त्याआधारे मुला-मुलींना शिकवले जाईल.
महिला बॉक्सरला देश सोडावा लागला
कमी वजनी गटातील बॉक्सिंग विजेत्या सीमा रेजाई यांनी देश सोडला आहे. तालिबानने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका मुलाखतीत सीमा म्हणाल्या- तालिबानी धमकीनंतर कुटुंबाने देखील त्यांना पाठिंबा देणे बंद केले होते. त्यामुळे देश सोडावा लागला. तालिबानच्या वर्चस्वादरम्यान सीमा प्रशिक्षण घेत होत्या.
ममतेच्या छायेतही तालिबानची भीती...निष्पाप मुलीस बुरखा
छायाचित्र काबूल विद्यापीठातील आहे. शनिवारी येथे शरिया कायद्यांतर्गत एक कार्यक्रम झाला. त्यात विद्यापीठातील ३०० तरूणी सहभागी झाल्या. सर्व तरुणी बुरख्यात हाेत्या. यादरम्यान एका महिला निष्पाप मुलीसह िवद्यापीठात आली हाेती. महिलेने या मुलीलाही बुरखा घातला हाेता. वर्ग सुरू असताना तरुणींना चेहरा दाखवण्याचीदेखील परवानगी नव्हती. तेथे तालिबानचा पहारा हाेता.
तालिबानींनी भररस्त्यात तरुणाला गाेळी मारली
तालिबानींनी पंजशीरमध्ये एका तरुणास त्याच्या घरातून बाहेर काढले. भररस्त्यात त्याच्या गाेळीबार केला. हा तरुण पंजशीरच्या नाॅर्दर्न अलायन्सच्या सैन्यात कार्यरत हाेता, असा तालिबानचा आराेप आहे. मृताचा सहकारी तालिबांनी त्याचे आयकार्ड दाखवू लागला. परंतु ते मान्य झाले नाही. त्यांनी गाेळ्या घातल्या.
पंजशीर नेता अहमद मसूद मायदेशातच
पंजशीर खाेऱ्यात तालिबानला त्रासून साेडणारे अहमद मसूद यांनी अफगाणिस्तान साेडलेला नाही. इराणच्या वृत्तसंस्थेने एका सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली. सूत्रानुसार मसूद देश साेडून तुर्कीला पळाल्याचे वृत्त खाेटे आहे. सध्या अहमद मसूद सुरक्षित ठिकाणी आहे आणि पंजशीर खाेऱ्याच्या संपर्कात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.