आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमजांना स्कॉटलंडचे स्वातंत्र्य हवे:युनायटेड किंगडमच्या ‘फाळणी’ वरून ऋषी सुनक व हमजा यांच्यात संघर्ष

युनाइटेड िकंगडम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युनाइटेड िकंगडममधील (यूके) भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि स्कॉटलंडचे पाकिस्तानी वंशाचे फर्स्ट मिनिस्टर (पीएमच्या समकक्ष) हमजा युसूफ यांच्यात संघर्ष पेटला आहे. मुद्दा आहे यूकेची फाळणी. स्कॉटलंडला यूकेपासून स्वातंत्र्य या अजेंड्यावर हमजा यांनी निवडणूक जिंकली आहे. यूकेचे पंतप्रधान सुनक हे फाळणीच्या विरोधात आहेत. सुनक यांचे म्हणणे आहे की, यूकेचा ऐतिहासिक भूगोल बदलण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. हमजांना फर्स्ट िमनिस्टर बनून आठवडाच झाला आहे. त्यांची अजून ब्रिटनचे किंग आणि पीएमसोबत औपचारिक भेटही व्हायची आहे.

कोरोनाच्या काळात स्कॉटिश स्वातंत्र्याची मागणी वाढली माजी फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन सार्वमतासाठी मान्यता घेऊ शकल्या नाहीत.कोरोना काळातील जनमत चाचणीनुसार ५६%स्कॉट यूकेपासून वेगळे होऊ पाहत होते. आता हमजा आल्यानंतर हे प्रमाण वाढेल.

चार देशांच्या युनायडेट किंगडम देशात कोणाचे कुठे राज्य? {ब्रिटन: ऋषी सुनक (पंतप्रधान) {स्कॉटलंड : हमजा युसूफ (फर्स्ट मिनिस्टर) {वेल्स : मार्क ड्रेकफर्ड (फर्स्ट मिनिस्टर) {उत्तर आयर्लंड : गॅरी मिडिलटन, डेकलेन किएरनी (दोघेही ज्युनिअर मिनिस्टर)

हमजांच्या हट्टाचा सुनक यांना फायदा हमजा स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम छेडणार आहेत. हमजांना सार्वमतासाठी कलम ३० लागू करायचे आहे. हे सुनकांसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. ब्रिटिश जनता स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. जनभावना लक्षात घेऊन फाळणी न होऊ देण्याचा सुनक यांचा राष्ट्रवादी डाव आहे. पुढील वर्षीच्या ब्रिटिश निवडणुकीत सुनक यांच्यासाठी हा चांगला मुद्दा ठरणार आहे.