आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एजीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला:इराणमध्‍ये  नैतिक पोलिस बरखास्तीवर संभ्रम, सरकारकडून दुजोरा नाही

तेहरान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात मोरॅलिटी पोलिस(नैतिक पोलिस) बरखास्त केल्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी हे वृत्त वेगळ्या पद्धतीने घेतल्याने ते छापण्यात घाई दाखवली आहे. इराणची न्यायपालिका आणि संसद महिलांना अनिवार्य पद्धतीने हिजाब परिधान करण्याच्या कायद्यावर फेरविचार करत आहे. मोरॅलिटी पोलिस गृह मंत्रालयाअंतर्गत येते. वृत्तानुसार, नैतिक पोलिस बरखास्त करण्याचा अधिकार अॅटर्नी जनरल यांच्याकडे आहे. नैतिक पोलिस निघतील की नाही,यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. शनिवारी अॅटर्नी जनरल मोंतजेरी यांनी सांगितले की, नैतिक पोलिस जेथून सुरू झाले तेथून बरखास्त होतील.

बातम्या आणखी आहेत...