आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मुलांमधील जन्मजात प्रतिकारशक्ती अज्ञात विषाणूपासून वाचवते, संसर्ग होण्यापूर्वीच कोरोनाचा होतो नायनाट

अपूर्वा मंडाविली | न्यूयाॅर्क7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुले कोरोनाशी कशी लढतात यावर अमेरिकेत संशोधन, चकित करणारे निष्कर्ष

वयस्करांच्या तुलनेत काेराेना विषाणूचा मुलांवर विपरीत परिणाम होत नाही. याचे अद्याप रहस्य उलगडले नाही. एक तर बहुतांश मुलांना संसर्ग होत नाही अन् झालाच तर ते लगेच बरे हाेतात.

वयस्कर आणि मुलांमधील प्रतिकारशक्तीचा तुलनात्मक अभ्यास करताना याचा शोध लागला आहे. सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, मुलांमधील प्रतिकारशक्ती (इम्युन सिस्टिम)चा एक भाग अज्ञात विषाणूपासून सुरक्षा करण्यात सक्षम असतो. मुलांच्या शरीराचे नुकसान करण्यापूर्वीच तो कोरोना विषाणू नष्ट करून टाकतो. अल्बर्ट आइन्स्टाइन कॉलेज अाॅफ मेडिसिनच्या डाॅ. बेट्सी हेरॉल्ड यांनी सांगितले की, मुलांची प्रतिकारशक्ती वेगळ्या पद्धतीने विषाणूंचा सामना करते. यामुळेच ते सुरक्षित राहत आहेत. वयस्करांची प्रतिकारशक्ती मंद झालेली असते. शरीरावर एखाद्या अज्ञात विषाणूचा हल्ला झाल्यास काही तासांमध्येच प्रतिकार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.यालाच जन्मत: प्रतिकारक्षमता म्हटले जाते. शरीराचे रक्षक लढण्यासाठी समोर येतात आणि बॅकअपसाठी संदेश पाठवतात. प्रतिकारशक्तीसाठी नव्या असलेल्या विषाणूंशी मुलांची अधिक लढाई होत असते. काळानुसार प्रतिकारशक्तीचा अशा अनेक विषाणूंशी सामना होत असतो. त्यामुळे अशा अज्ञात शत्रूंचा मुकाबला करण्याची क्षमता विकसित होत जाते. वय वाढते तसे शरीर स्मृती आणि धोकादायक गोष्टींचा सामना करण्याचे तंत्र आत्मसात करते. बोस्टनस्थित हार्वर्ड टीएच चान स्कूल अाॅफ एपिडेमॉलॉजीचे बालरोगतज्ज्ञ डॉ.मायकेल मीना यांच्या मते, जन्मत: जी प्रतिकारशक्ती असते ती आपत्कालीन सैनिकांना सज्ज करत असते.

वय वाढल्यानंतर वयस्करांमधील पूरक तंत्र कमी होत जाते

कोरोना विषाणू सर्वांसाठीच नवा आहे. वाढत्या वयागणिक माणसातील प्रतिकार शक्तीचे पूरक तंत्र कमी होत जाते म्हणून विषाणू शरीरावर सहज आक्रमण करतात. वयस्करांमध्ये हे पूरक तंत्राची प्रक्रिया सुरु होण्यास उशीर लागतो. हे संशोधन ६० वयस्कर व्यक्ती आणि ६५ मुलांवर करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...