आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Congestion, Increase In Patient Numbers Due To Travel, Demand For Re lockdown; Patients Doubled In 50% Of European Countries In Two Weeks

कोरोना संकट:गर्दी, प्रवासामुळे रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा लॉकडाऊनची मागणी; दोन आठवड्यांपासून युरोपातील 50% देशांत रुग्ण दुप्पट

रुडी रुटेनबर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्रान्सने लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला, माद्रिद बंद

युरोपीय देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची मागणी होऊ लागली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत अचानक होऊ लागलेली वाढ यामागील कारण आहे. वैद्यकीय तज्ञांनुसार, सामाजिक कार्याक्रमांमध्ये जास्त गर्दी केल्याने आणि मोठ्याप्रमाणात प्रवास होत असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. फ्रान्समध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर पहिल्यांदा गुरुवारी सर्वाधिक १०५९३ रुग्ण आढळले. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिविअर वेरन म्हणाले की, महामारी सक्रीय झाली आहे. यामुळे कोणीही बेजबाबदारपणे वागू नये. आम्ही स्थानिक प्रशासनाला आपल्या पात‌ळीवर लॉकडाऊन सारखे उपाय लागू करण्यास सांगितले आहे. वेरन म्हणाले, सध्या देशव्यापी लॉकडाऊन लागू करणार नाही. तर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांनी याच आठवड्यात लोकांनी कोरोनासोबत जगण्यास शिकायला हवे, असे म्हटले होते. दुसरकडे फ्रान्समध्ये गेल्या दोन आठवड्यात आयसीयूमध्ये दाखल रुग्णांची संख्या अचानक ८०० वर पोहोचली आहे. हा जूनच्या १५ तारखेनंतर वाढला. तरुणांमध्येही विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. मात्र आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्यांमध्ये वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत ४,१५४८१ रुग्ण आढळले आहेत.

जर्मनी : पूर्वीसारखी स्थिती होणार नाही हे बघणार

जर्मनीमध्ये एप्रिलनंतर प्रथमच सर्वाधिक २००० नवे रुग्ण आढळले आहेत. अर्थमंत्री पीटर अल्टमेयर यांनी युरोपीय संघातील देशांच्या मंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितले, जर्मनीत रुग्ण वाढत आहेत. युरोपमध्ये पूर्वीसारखी स्थिती होणार नाही, हे सुनिश्चित करावे लागेल. जर्मनीत आतापर्यंत २,६९, ४११ रुग्ण असून ९,४६० मृत्यू झाले आहेत.

ब्रिटन : रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण वेगाने वाढले

ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉग यांनी सांगितले, देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल. पूर्ण ब्रिटनमधील रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील आठवड्यात ब्रिटनमध्ये सरासरी ३३०० रुग्ण आढळत आहेत.ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३,८१,६१४ रुग्ण असून ४१,७०५ मृत्यू झाले आहेत.

बाकी युरोप : ऑस्ट्रिया गर्दी, आयर्लंड प्रवास रोखतोय

ऑस्ट्रियामध्ये सोमवारपासून १० पेक्षा जास्त जणांना एकत्रित येता येणार नाही. आयर्लंडच्या डब्लिनमध्ये शनिवारपासून सर्व बार बंद करण्यात येतील. येथे दुसऱ्या शहरांमध्येही प्रवास करता येणार नाही. वियनाकडून लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरू आहे. पोर्तुगालमध्ये ५ महिन्यांत पहिल्यांदाच सर्वाधिक ७७० रुग्ण आढळले.

स्पेन : राजधानी माद्रिदमध्ये आयसीयू बेड उपलब्ध नाही

स्पेन राजधानी माद्रिदमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची तयारी करत आहे. मॅड्रिडमधील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी आयसीयूमध्ये बेड शिल्लक नाही. पूर्ण शहरातील रुग्णालयांमध्ये २१ टक्के बेड रुग्णांसाठी रिकामे ठेवण्यात आले होते. स्पेनमध्ये दोन दिवसांपासून ११ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

युरोपाबाहेर : इस्रायलमध्ये ३ आठवड्यांचा लॉकडाऊन

​​​​​​​इस्रायलमध्ये शुक्रवारी दुसरा लॉकडाऊन लावण्यात आला. असे करणारा इस्रायल पहिला देश ठरला आहे. हा लॉकडाऊन तीन आठवड्यापर्यंत असेल. या दरम्यान शाळा- महाविद्यालये सारख्या संस्था आणि दुकाने बंद असतील. परदेशी दौरा करण्यासाठी आणि बाहेरून येणाऱ्यांवर बंदी असेल. लोकांकडून लॉकडाऊनला विरोध होत आहे.

डब्ल्यूएचओ: सतर्क व्हा, युरोपात २.२८ लाख मृत्यू

डब्ल्यूएचओचे क्षेत्रीय संचालक हॅन्स क्लुगे यांनी युरोपीय देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचे चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, गेल्या दोन आठवड्यात युरोपातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण दुप्पट झाले आहेत. पूर्ण युरोपात आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर २.२८ लाख मृत्यू झाले आहेत.