आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटिश पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना संसदेची दिशाभूल केल्याबद्दल अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला. प्रस्ताव पारित झाल्यास पंतप्रधानपदासह काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख पदही सोडावे लागेल. तथापि, पक्षाच्या पुढील अध्यक्षाची निवड होईपर्यंत जाॅन्सन पंतप्रधानपदी राहतील. पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया किचकट आहे. याला एक महिना लागू शकतो. या प्रकरणाची संबंधित प्रश्नांची उत्तरे...
-काँझर्व्हेटिव्ह खासदार काय विचार करतात?
काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या किचकट नियमांमुळे असे संकट येते. पक्षाचेच बॅकबेंचर खासदार अविश्वास प्रस्ताव आणतात. तेव्हा १५% खासदार पक्षाच्या १९२२ सदस्यांच्या प्रतिनिधित्व समितिकडे याची मागणी करतात. पक्षाचे ३५९ खासदार आहेत. त्यामुळे ५४ खासदारांनी चिठ्ठी लिहिली आहे.
-मतदान कसे होईल?
प्रस्तावावर सर्व खासदार मतदान करू शकतात. निकाल साधारण बहुमताने निश्चित होतो. जाॅन्सन यांना हटवण्यासाठी कमीत कमी १८० खासदारांचे समर्थन गरजेचे आहे.
जॉन्सन यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव का आला?
जॉन्सन यांचा या वर्षीचा बहुतांश वेळ कोविड लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्याच्या आरोपांत आणि विरोधकांच्या हल्ल्यांपासून सरकार वाचवण्यात गेला आहे. जॉन्सन, त्यांचे चान्सलर व त्यांच्या पत्नीवर पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्यामुळे दंड लावला आहे. पंतप्रधान व त्यांच्या जवळच्यांवर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड लावण्याची ब्रिटनच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.