आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन अब्जाधीशाच्या मृत्यूचे गूढ:केवळ 13 दिवसांत 3 रशियन नागरिकांचे मृत्यू की कट-कारस्थान

मुकेश माथुर | भुवनेश्वर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशात केवळ १३ दिवसांत तीन रशियन नागरिकांचा मृत्यू झाला. यात १४ कोटी डॉलरची (सुमारे ११५१ कोटी रुपये) सॉसेज कंपनी व्लादिमीर स्टँडर्डचे मालक आणि खासदार पॉवेल अँटोव्ह यांचा मृत्यू सर्वात गूढ ठरला. २४ डिसेंबरला पॉवेल यांचा मृतदेह रायगडाच्या हॉटेल साई इंटरनॅशनलच्या एका खोलीच्या छतावर आढळून आला होता. तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने हा मृत्यू झाल्याचे कारण पोलिसांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे घटनेच्या दोन दिवस आधी पॉवेलसोबत आलेले व्लादिमीर बिडेनोव्ह यांचाही कथित

हृदयगती बंद झाल्याने हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता. या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी दैनिक भास्कर घटना घडलेल्या हॉटेलपर्यंत पोहोचले होते. तेथील हकीगत पाहून निर्माण झालेले प्रश्न या केवळ दुर्घटना नसून कटही असू शकतो, हे दर्शवणारे आहेत. तिसरा नागरिक इंजिनिअर: या दोन मृत्यूंनंतर तिसऱ्या रशियन नागरिकाचा गूढ मृत्यू ३ जानेवारीला चितगाव ते मुंबईकडे निघालेल्या मालवाहू जहाजात आेडिशातील बंदर पारादीपपासून १२ किमीवरउर्वरित. झाला. जहाजाचे मुख्य अभियंता सेर्जेईच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. त्यात मृत्यूचे कारण ह्रदयगती बंद पडणे हेच सांगण्यात आले. सेर्जेई यांनीही कधी पुतीन यांच्या विरोधात युद्धावरून काही भूमिका घेतली होती का? किंवा काही विरोधी वक्तव्य होते का, हे समजू शकले नाही.

पॉवेल यांच्यासमवेत आणखी दोघे : पॉवेल व व्लादीमिर उतरलेल्या हॉटेलमध्ये आणखी दोन पर्यटकही होते. नटालिया व मिखाइल अशी त्यांची नावे आहेत. पॉवेल व व्लादिमीर दुसऱ्या मजल्याच्या खोलीत मुक्कामी होती तर मिखाइल व नटालिया खालच्या मजल्यावरील एका खोलीत होते. २२ डिसेंबरच्या सकाळी सगळे उठल्यानंतर व्लादिमीर यांचा मृतदेह त्यांच्या खाेलीत आढळला. त्यांच्या मृत्यूचे कारण ह्रदयविकाराचा झटका सांगण्यात आले. पॉवेल नंतर दुसऱ्या खोलीत राहिले. त्यांचा २४ रोजी मृतदेह आढळला. मिखाइल यांनी पॉवेल यांच्यावर अंत्यसंस्कार करवून घेतले. यादरम्यान एका व्हिडिओत ते फोटोग्राफी करताना दिसले. मिखाइल रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. पण पुष्टी होऊ शकली नाही. एक महिन्यापूर्वी भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर आणखी एक रशियन नागरिक बेपत्ता झाला होता. त्याची पुतीन विरोधी चिठ्ठी आणि आेडिशात एकापाठोपाठ होणाऱ्या या घटना यांचा परस्पर संबंध काय आहे? या गोष्टी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत.

4 कळीचे प्रश्न, क्राइम सीनने समोर
1. खाली का पडले नाहीत ?
पॉवेल यांची खोली ३० फूट उंच होती. आत्महत्या करायची असती तर खाली उडी घेतली असती. परंतु मृतदेह खोलीच्या छतावर आढळून आला. तो जमिनीपासून सुमारे १० फूट उंचीवर होता.
2. साधे खरचटलेही का नाही ? प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार पॉवेव यांच्या शरीरावर साधे खरचटलेही नव्हते. उंचावरून पडल्यानंतर जखम होऊ शकते.
3. लाळेचे नमुने का घेतले नाहीत? पॉवेल यांच्या मृत मित्राच्या लाळेचे नमुने घेतले. मग पॉवेल यांचे का नाही?
4. दूतावासातून कुणी का आले नाही ? उद्योगपती, खासदाराचा इतर देशात मृत्यू झाल्यानंतर दूतावासातून कुणी शोकही व्यक्त केला नाही. हे अजबच.

4 तथ्ये, यामुळे कटाचा संशय
1. मुलीची दहनाची परवानगी ; ‘पार्थिवाचे दहन करून अस्थी पाठवा’ हा पॉवेलच्या मुलीचा आग्रह असल्याने दहन करण्यात आले. रशियात केवळ १० टक्के बेवारस मृतदेहांचे दहन होते.
2. स्वस्त हॉटेलमध्ये मुक्काम ; लोकप्रतिनिधी असूनही सामान्य नागरिकांप्रमाणे टुरिस्ट व्हिसावर आले. केवळ अडीच हजार रुपयांच्या खोलीत उतरले. सुरुवातीला ते कोण आहेत, हेदेखील समजले नव्हते.
3.विषप्रयोग समजू शकणार नाही : रशियात अनेक पुतीनविरोधी व्यक्तींचा विषप्रयोगाने मृत्यू झाला. पॉॅवेल यांच्या प्रकरणात लाळ अहवाल नसल्याने ते स्पष्ट होणार नाही.
4. उशीर का? ; रोज ब्रीफिंग देणाऱ्या रायगडा पाेलिसांनी २४ तासांनंतर माहिती दिली.

1,151 कोटींच्या कंपनी मालकावरील दहनसंस्कार असा उरकला
रशियन खासदार व एक हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक पॉवेल यांच्यावरील दहनसंस्काराचे हे छायाचित्र पहिल्यांदाच दैनिक भास्कर उजेडात आणत आहे. २४ डिसेंबरच्या सायंकाळी ७.३० वाजता पॉवेलचा गाइड, हॉटेल स्टाफला मृतदेह खोलीच्या छतावर आढळला. २६ पर्यंत रशियन दूतावास आणि मुलीच्या सहमतीनंतर अंत्यसंस्कार झटपट उरकले.

बातम्या आणखी आहेत...