आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन निवडणूक:यूट्यूबवर निकालात हेराफेरीच्या खोट्या बातम्यांचे सतत प्रसारण

निको ग्रँटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

८ नोव्हेंबरला होणाऱ्या अमेरिकन संसदेच्या मध्यावधी निवडणुकीबाबत खोट्या बातम्या, चुकीची माहिती आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. रॅलींव्यतिरिक्त सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. उदा. काही लोकांनी यूट्यूबवर दावा केला की, डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आणि सौदी अरेबिया मध्यावधी निवडणुकांवर प्रभाव टाकत आहेत. एका पुराणमतवादी कार्यकर्त्याने व्हिडिओमध्ये दावा केला की, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या निकालांमध्ये हेराफेरी होईल. यूट्यूबवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हेराफेरीचे बिनबुडाचे दावे केले आहेत. खोट्या बातम्यांचा मागोवा घेणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यूट्यूब या गुगलच्या प्लॅटफॉर्मने चुकीची माहिती रोखण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. पण, तसे होताना दिसत नाही. ते विशेषतः टिकटाॅक आणि स्पॅनिश भाषेतील व्हिडिओसारखे छोटे व्हिडिओ प्रदान करणाऱ्या यूट्यूबच्या सेवेबद्दल चिंतित आहेत.

एक डझनहून अधिक संशोधकांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे समजून घेणे कठीण आहे, कारण त्यांच्याकडे माहिती नाही. खोट्या माहितीवर काम करणाऱ्या स्ट्रॅटेजिक डायलॉग इन्स्टिट्यूटच्या ज्योर क्रेग यांच्या मते, फेसबुक किंवा ट्विटरवर आढळणाऱ्या कंटेंटवर संशोधन करणे सोपे आहे, पण व्हिडिओवर कठीण. यातून यूट्यूब सहज सुटते.

२०२० च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा दावा करणाऱ्या व्हिडिओंवर यूट्यूबने बंदी घातली होती. असे असले तरी मध्यावधी निवडणुकांसाठी असे धोरण आखले जात नसल्याची जोरदार टीका होत आहे. मीडिया मॅटर्स अमेरिकाचे अध्यक्ष अँजेलो कारुसोन म्हणतात, इमारतीला आग लागल्यानंतर तुम्ही अग्निशामक यंत्रणा बसवत नाही.

बातम्या आणखी आहेत...