आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Construction, Factories Started; Small Shops To Open In Italy Today; Most Affected Countries Spain And Italy Discounted Lock Down

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेन:बांधकाम, कारखाने सुरू; इटलीत आज लहान दुकाने उघडणार; सर्वाधिक प्रभावित देश स्पेन व इटलीत लॉकडाऊनमध्ये सूट

माद्रिदएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाबाधितांत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे स्पेन, नवीन प्रकरणे, मृत्यू दोघांतही होतेय घट

स्पेनमध्ये सोमवारी लॉकडाऊन अंशत: उठवण्यात आले. बांधकाम, उत्पादन आणि काही सेेवा क्षेत्रात कडक सुरक्षा उपायांमध्ये लोक कामावर आले. राष्ट्रीय धोरणानुसार मेट्रो, बस आणि रेल्वेस्थानकांवर मास्क वाटण्यात आले. मात्र, स्थानकांवर सामान्यांच्या तुलनेत गर्दी खूप कमी होती. कारण २७ मार्चपासून लागू लॉकडाऊन २५ एप्रिलपर्यंत लागू असेल. या काळात बार, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. आतापर्यंत येथे १ लाख ६६ हजारांपेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. १७ हजार २०९ मृत्यू झाले. मात्र गेल्या काही दिवसांत मृत्यू आणि नव्या प्रकरणांची संख्या घटली आहे. काही रुग्णालयांत आयसीयूत जागा उपलब्ध होत आहे. वैद्यकीय उपकरणांचा अजूनही अभाव आहे. लॉकडाऊनमुळे येथे बेरोजगारांचा आकडा ३ लाख २ हजार २६५ झाला आहे.

स्पेन : २६ मार्चला सर्वाधिक नवी प्रकरणे, २ एप्रिलला मृत्यू

स्पेनमध्ये एका दिवसात ८ हजार २७१ प्रकरणे २६ मार्चला आली. नंतर २९ मार्चपर्यंत प्रकरणे कमी होत गेली. मात्र ३० रोजी आकडे पुन्हा वाढले. १ एप्रिलला ८ हजार १९५ नवी प्रकरणे समोर आली. नंतर आकडे पुन्हा घटले. सोमवारी २६६५ नवी प्रकरणे आली. २ एप्रिलला येथे सर्वाधिक ९६१ मृत्यू झाले होते. त्यानंतर चढ-उतार हाेत आकडे कमी होत राहिले. ११ एप्रिलला ५२५ मृत्यू झाले. मात्र १२ एप्रिलला ६०३ मृत्यू झाले. कोरोनाच्या प्रकरणात स्पेन दुसऱ्या क्रमांकावर अाहे. अमेरिकेत सर्वाधिक ५ लाख ६० हजार ४३३ प्रकरणे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर इटलीत १ लाख ५६ हजार ३६३ रुग्ण आहेत.

इटली: ३ मेपर्यंत लॉकडाऊन, कारखाने सध्या बंदच राहतील

इटलीत पुस्तके, स्टेशनरी आणि मुलांच्या कपड्यांची दुकाने मंगळवारपासून उघडतील. मात्र लॉकडाऊन ३ मेपर्यंत लागू राहील. सध्या कारखाने पुन्हा उघडण्यास परवानगी नाही. येथे एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंचा आकडा १९ मार्चनंतर सतत कमी होत आहे. रविवारी ४४३१ मृत्यू झाले. येथे ९ मार्चला लॉकडाऊन लावले. त्यात केवळ किराणा आणि औषधाची दुकाने उघडण्याची परवानगी होती.

बातम्या आणखी आहेत...