आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी:10 लाख लोकसंख्येसाठी नव्या त्रिस्तरीय शहराची उभारणी सुरू, फक्त पाचच मिनिटांवर शाळा, एअर टॅक्सी, कृत्रिम पावसाचीही सुविधा

सौदीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2024 पर्यंत पूर्ण होणार भविष्यातील नव्या शहराचे काम, 15 लाख कोटींचा खर्च

अवघे शहर प्रदूषणमुक्त ऊर्जेने संचालित, रस्ते व कार्सचा मागमूसही नाही, चोहीकडे हिरवळ... हे दृश्य एखाद्या चित्रपटातील नव्हे तर सौदी अरेबियात आकारास येत असलेली फ्यूचर सिटी ‘द लाइन’चे आहे. या इको सिटीची उभारणी सुरू झाली आहे. २०२४ पर्यंत लोक येथे राहू शकतील. गेल्या जानेवारीत सुमारे १७० किमी परिघातील या ‘द लाइन’ विशेष क्षेत्राबाबत क्राउन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांनी माहिती दिली होती. आता त्याचे काम सुरू झाले आहे. या शहराची निर्मिती तीन स्तरांत होईल. पहिला लेअर पायी चालणाऱ्यांसाठी, तर दोन लेअर्स वाहतूक व पायाभूत आरखड्यासाठी असतील. प्रकल्पाचे सीईओ नदमी अल नस्र म्हणाले, ‘हा विशाल प्रोजेक्ट असल्यामुळे डेव्हलपर्स दोन टोकांवर त्याचे काम सुरू करत आहेत. या इको सिटीत १० लाख लोक राहू शकतील. ते अल्ट्रा हायस्पीड ट्रान्झिट व ऑटोनोमस मोबिलिटी सोल्युशन्सशी जुळलेले असतील. शाळा, रेस्तराँ, दुकान सर्व रहिवासी भागांपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर असतील. कोणताही प्रवास २० मिनिटांपेक्षा जास्त नसेल. निर्मितीत ९५% प्राकृतिक संसाधने सुरक्षित राहतील. प्रकल्पावर १५ लाख कोटी रुपये खर्च होतील. यातून ३.८ लाख रोजगार निर्माण होतील. सध्या १५०० कर्मचारी साइटवर राहूनच काम करत आहेत.

‘द लाइन’ हा प्रोजेक्ट निओमचा भाग आहे. त्या अंतर्गत सौदीच्या जॉर्डन व इजिप्त हद्दींवर ३७.५ लाख कोटींच्या खर्चातून मेगासिटीची उभारणी होईल. हा जगातील सर्वात मोठा कार्बनमुक्त प्रकल्प असेल. त्यात १६ उपनगरे असतील. ऊर्जेसाठी ती वायू व सौरऊर्जेवर अवलंबून असतील. येथे पाण्याचे ऑक्सिजन व इंधनासाठी हायड्रोजनमध्ये रूपांतराच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल.

हा पूर्णपणे फ्री झोन असेल, कायदेही सौदी अरेबियापेक्षा वेगळे
सौदीला सिलिकॉन व्हॅलसारख्या तंत्रज्ञान केंद्रात बदलणे हा प्रकल्पाचा हेतू आहे. अत्याधुनिक जीवनशैलीची इच्छा असणाऱ्यांना येथे घर मिळेल. व्यावसायिक भरभराटीसह पर्यावरण संरक्षणावर भर असेल. येथे एआय संचालित फ्लाइंग ड्रोन टॅक्सी, रोबोटिक डायनोसॉरसह ज्युरासिक पार्कसारखा अॅम्युझमेंट पार्कही असेल. जगातील सर्वात मोठे कोरल गार्डन, क्लाउड सीडिंग आणि विशाल कृत्रिम चंद्र येथे अद्भूत विश्व उभारेल. हा फ्री झोन असेल, म्हणजेच, येथील कायद सौदीच्या कायद्यांपेक्षा वेगळे असतील.

बातम्या आणखी आहेत...