आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्हाला सकाळी दात स्वच्छ करण्याचा कंटाळा असेल तर लास वेगासमधील ग्राहकांसाठी असलेल्या इलेक्ट्राॅनिक प्रदर्शनातून तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. या प्रदर्शनात एक विशेष ब्रश मांडण्यात आला आहे. हा वाय-ब्रश असून त्याद्वारे दात स्वच्छ करणे आणि केवळ दहा सेकंदांत ताेंडाची प्रभावीपणे स्वच्छता करणे शक्य हाेईल. दात स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला बाेटांची हालचालदेखील करण्याची गरज भासणार नाही. एकदा चार्ज केल्यावर २०० मैल चालू शकेल, अशी सायकल प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाली. कधीही न उतरणारी बॅटरी देखील चकीत करणारी होती.
विषाणूचा नायनाट करणारे हायटेक मास्कही उपलब्ध
एअरशाेम नावाचा हायटेक मास्क या प्रदर्शनात पाहायला मिळताे. ताे जिवाणू-विषाणूंपासून सुरक्षा देताे, असा दावा करण्यात आला. यामुळे प्रदूषणापासूनही संरक्षण मिळते.
बाळ का रडतेय, बेबी स्लीप ट्रेनर सांगणार
जपानी कंपनी फर्स्ट असेंटने एनिन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित बेबी स्लीप ट्रेनर बाजारात आणण्याची तयारी केली आहे. बाळाची झाेपमाेड का झाली? का रडतेय? याचे कारण ते सांगेल.
स्वयंचलित वाय-ब्रशची फ्रान्समध्ये निर्मिती
वाय-ब्रशची निर्मिती फ्रान्समध्ये झाली . फास्टेश कंपनीने दंततज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याचे उत्पादन केले. ही प्रक्रिया तीन वर्षे चालली. नंतर आॅटाेमॅटिक साेनिक ब्रश तयार झाला.
हायटेक ब्रेन-स्कॅनर
काेरियाची कंपनी आयमेडी सिंक कंपनीने आयसिंक वेव्ह हे उत्पादन प्रदर्शनात मांडले. हे एक प्रकारचे पाेर्टेबल ब्रेन स्कॅनर आहे. रुग्णाची आराेग्यस्थिती नेमकी कशी आहे याचे विश्लेषण या उपकरणाद्वारे केवळ दहा मिनिटांत हाेऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.