आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास:काँटॅक्ट लेन्सच्या वापराने कॅन्सरची जाेखीम वाढतेय; यकृत, मूत्रपिंड खराब होऊ शकते

न्यूयॉर्क17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेसह अन्य देशांत काँटॅक्ट लेन्सचा वापर तरुणाईत वाढत आहे. यामुळे कॅन्सरसारख्या आजाराची जोखीम वाढत आहे. यकृत, मूत्रपिंडही खराब होण्याची शक्यता राहते.

नुकतेच नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधनात प्रचलित १८ ब्रँडच्या काँटॅक्ट लेन्सची तपासणी केली. यात १४,००० प्रकारच्या रसायनांचा समूह आढळला. हा सर्वसाधारणपणे हजारो ग्राहक उत्पादकांना पाणी, डाग आणि उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. फ्लोरोपॉलिमर म्हणजे, एक साॅफ्ट प्लास्टिक सामग्री असते आणि एकदा ती त्वचेशी जोडल्यावर काढायला त्रास होतो. यामुळे गंभीर आरोग्य जोखमीची शक्यता राहते. संस्थेने प्रमाणित प्रयोगशाळेतून चाचणी केल्यावर समोर आले की, काही काँटॅक्ट लेन्समध्ये ऑर्गेनिक फ्लोरिनचे प्रमाण जास्त होते. यामध्ये १०५ पीपीएमपेक्षा २०,७०० पीपीएमदरम्यानच्या पातळीत रसायन आढळले. मात्र, पीएफएएसच्या सर्व अनावश्यक वापरांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून तो २०३० पासून लागू होईल.

हे रसायन टॉयलेट पेपर व प्लास्टिक कंटेनरमध्ये असतात
पीएफएएससारख्या रसायनांच्या उपयोगासंदर्भात कंपन्या माहिती देत नाहीत. मात्र, पुरवठा साखळीत अनपेक्षितपणे या रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. गेल्या काही वर्षांत समोर आले होते की, अशा प्रकारच्या रसायनांचा वापर टॉयलेट पेपर आणि प्लास्टिक कंटेनरमध्येही केला जात आहे.