आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका:श्रीलंकेत वादग्रस्त दुरुस्तीचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळासमोर, राष्ट्रपतींच्या अमर्याद अधिकारांवर नियंत्रणाची तरतूद करणार

कोलंबोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेतील वादग्रस्त २१ व्या घटनादुरुस्तीचा मसुदा सोमवारी मंत्रिमंडळापुढे मांडला जाणार आहे, अशी माहिती कायदेमंत्र्यांनी दिली. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास राष्ट्रपती गोटाबाया राजपाक्षे यांच्याकडील निरंकुश अधिकारांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग मोकळा होईल.

राष्ट्रपतींपेक्षा सर्वोच्च संसद होती. परंतु १९ व्या दुरुस्तीनंतर राष्ट्रपतींना अमर्याद अधिकार मिळाले आहेत. या तरतुदीनुसार दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना संसदेचे सदस्य मिळवता येणार नाही, असे कायदेमंत्री डॉ. विजयादासा राजपाक्षे यांनी स्पष्ट केले. पूर्वी गोटाबाया यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व होते. परंतु त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये निवडणूक लढवण्याच्या आधी नागरिकत्व सोडले होते.

वास्तविक श्रीलंका आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे. नागरिकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजापक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यावरून देशभरात आंदोलन सुरू आहे. देशात अजूनही हिंसाचार, अस्थैर्य दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...