आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मनाचा रिमोट कंट्रोल - विचार करताच कारच्या खिडकीची उघडझाप, रेडिओ चॅनल बदलेल; कारचे गेमिंग व सिनेमा लाउंजमध्ये रूपांतरही

म्युनिचएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोपातील ऑटो शो आयएए म्युनिचमध्ये विअरेबल ब्रेन कॉम्प्युटर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

आपण कारची खिडकी उघडावी, असे मनात येताच ती उघडेल किंवा बंद होईल. रेडिओचे चॅनल सुरू व्हावे, कोणतेही बटण न दाबता फोन कॉलचे उत्तर देऊ, तसेच ज्या ठिकाणी जायचे आहे त्या रस्त्यावर कार आपोआप चालू लागली तर.. आजवर आम्ही हे सिनेमातच पाहिले. परंतु मर्सिडीझने ते वास्तवात उतरवले आहे. कंपनीने विअरेबदल ब्रेन कॉम्प्युटरद्वारे लेस व्हिजन एव्हीटीआर सादर केला आहे. यात सर्वच अाधुनिक फीचर मिळतील. असेच मस्त फीचर आणि शानदार सुविधा असलेल्या कार जर्मनीतील म्युनिचमध्ये सुरू असलेल्या आयएएए मोबिलिटी ऑटो शोमध्ये सादर करण्यात आल्या. याबाबत विस्ताराने वाचा...

मेंदूत सुरू असलेल्या हालचालींचे विश्लेषण करून स्वत: कमांड घेईल
मर्सिडीझ व्हिजन एव्हीटीआर : या कारमधील अनेक फंक्शन केवळ विचाराने नियंत्रित होतात. युजरला विअरेबल ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस घालून डिजिटल डॅशबोर्डवरील सेन्सरवर लक्ष द्यावे लागेल. कारची एआय टेक्नॉलॉजी मेंदूतील लहरींचे विश्लेषण करून तुमचे लक्ष कुठे आहे, याचा वेध घेते आणि त्याला कमांड म्हणून स्वीकारते. ती आधीच फीड केलेल्या रस्त्यांवरही चालेल.

स्टिअरिंगच्या जागी जॉयस्टिक दिले, ड्रायव्हरला जास्त नियंत्रण मिळेल
ह्युंदाई प्रोफेसी: या कारची चर्चा खूप दिवसांपासून होती. परंतु लोकांसाठी ती प्रथमच या प्रदर्शनात सादर केली गेली. यात स्टेअरिंगच्या जागी चालकाच्या दोन्ही बाजूंना जॉयस्टिक दिले आहेत. तिची एअरकॉन सिस्टिम वातावरणातील हवा शुद्ध करून कारमध्ये पाठवते. कारमध्ये आरामात बसून बाहेरील दृश्यांचा चांगला आनंद घेऊ शकतात. कारण यावेळी डॅशबोर्ड डिस्प्लेमध्ये रूपांतरित होतो.

७ सेकंदांत १०० ची गती पकडेल, सिंगल चार्जमध्ये ४०० किमी रेंज
फोक्सवॅगन आयडी लाइफ: ही शहरी क्रॉसओव्हर कन्सेप्टवर आधारित कॉम्पॅक्ट कार आहे. यात व्हिडिओ गेम कंसोल आणि प्रोजेक्टर दिला आहे. प्रोजेक्शन स्क्रीनही आहे जी गरजेनुसार डॅशबोर्ड पॅनलनेे उघडते. याद्वारे कारला गेमिंग किंवा मुव्ही लाउंजमध्ये बदलू शकेल. रूफ डिटॅचेबल आहे. ७ सेकंदांत १०० ची गती घेते. सिंगल चार्जिंगमध्ये ४०० कि.मी. रेंज देते.

बातम्या आणखी आहेत...