आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Converting Seniors To Vaccines Is Challenging For The United States, Even Less Likely To Have An Effect

दिव्य मराठी विशेष:लसीसाठी वृद्धांचे मन वळवणे अमेरिकेसाठी आव्हानात्मक, कमी प्रभावाचीही शक्यता

अपूर्वा मंडावली | न्यूयॉर्क7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायझर-मॉडर्नाच्या आश्वासनानंतरही 70 वर्षीयांत अजून घबराट

अमेरिकेत फायझरच्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात झाली आहे. लवकरच मॉडर्नाच्या लसीलादेखील नियामक संस्थेकडून हिरवा कंदील मिळेल. दोन्ही लसी ९५ टक्के प्रभावी व सुरक्षित असल्याचा दावा केला गेला. असे असले तरी अमेरिकेतील वृद्ध लोकांना लसीकरणासाठी तयार करणे हे अमेरिकी आरोग्य विभागासमोरील मोठे आव्हान ठरू लागले आहे. लसीला परवानगी देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीमधील एका सदस्याने वृद्धांवरील वापराच्या विरोधात मत टाकले होते. समितीचे सदस्य डॉक्टर हेलेन कीप टालबोट यांच्या म्हणण्यानुसार लसीला सध्या आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे. परंतु सामान्यपणे लसीचे परीक्षण केले जाते तसे या लसीचे करण्यात आलेले नाही. म्हणूनच लस वृद्धांमध्ये प्रभावीपणे काम करू शकली नाही किंवा तिचे साइड इफेक्ट दिसल्यास लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ शकते. दुसरीकडे आतापर्यंतच्या परीक्षणात लस सुरक्षित असल्याचे पुरावे आहेत.

आपत्कालीन परवानगी, निम्मे तयार

महामारीवर लवकर विजय मिळवण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या कोरोना लसींचा वापर सुरू झाला आहे. लसीच्या नियमित वापराऐवजी आपत्कालीन स्थितीत वापराची परवानगी आहे. त्यामुळे निम्मे अमेरिकी साशंक झाले आहेत. व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठाच्या एका पाहणीनुसार ४६.९ टक्के लोकांनी लस घेण्याची इच्छा दर्शवली. मात्र नियमित परवानगी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...