आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये आजपासून COP27 क्लायमेट परिषद:गुटारेस म्हणाले - क्लायमेट चेंज सर्वात मोठे आव्हान, विकसित व मागास देशांना एकत्र यावे लागेल

कैरोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

COP27 क्लायमेट परिषद आजपासून इजिप्तमध्ये सुरू होत आहे. त्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगभरातील अनेक नेते सहभागी होणार आहेत. इजिप्तच्या शर्म अल-शेख शहरात 6 ते 18 नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या परिषदेत भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही सहभागी होणार आहेत.

बैठकीत जगभरातील नेते क्लायमेट चेंज अर्थात हवामान बदल व त्यावरील तोडग्यावर चर्चा करतील. गत काही वर्षांत हवामान बदलामुळे अवघ्या जगापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या बैठकीचे मुख्य लक्ष्य क्लायमेट फायनांस म्हणजे हवामान बदलाचा निपटारा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर असेल.

जगाची विनाशाकडे वाटचाल -गुटारेस

या बैठकीपूर्वी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस म्हणाले - विकसित व गरीब देशांतील अंतर COP27 चा सर्वात मोठा मुद्दा आहे. विकसित देशांनी क्लायमेट चेंजप्रकरणी विकसनशील देशांसोबतच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली पाहिजे. असे झाले नाही तर हे जग उद्ध्वस्त होईल. प्रस्तुत करारांतर्गत हवामान बदलाचा निपटारा करण्यासाठी गरीब देशांना वार्षिक 100 अब्ज डॉलर्सचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुटारेस म्हणाले - जग वाढते तापमान, अतिवृष्टी व पुरामुळे त्रस्त आहे. त्यामुळे श्रीमंत व गरीब देशांतील दरी कमी झाली नाही तर विनाश ओढावेल.
गुटारेस म्हणाले - जग वाढते तापमान, अतिवृष्टी व पुरामुळे त्रस्त आहे. त्यामुळे श्रीमंत व गरीब देशांतील दरी कमी झाली नाही तर विनाश ओढावेल.

भारत विकसित देशांकडून मागणार मदत -भूपेंद्र यादव

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत विकसित देशांकडे मदत मागेल. COP27 बैठकीपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले - भारत विकसित देशांकडून विकसनशील देशांसाठी अर्थ पुरवठा व तंत्रज्ञान हस्तांतरणाची मागणी करेल. यामुळे या देशाना हवामान बदलाच्या आव्हानाचा निपटारा करण्यासाठी मदत मिळेल.

COP वर जगाची नजर

2022 मध्ये इंग्लंडसह संपूर्ण युरोपात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैरान झाले. पाकिस्तानातही यंदा अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली. भारतात प्रथम उष्णतेच्या लाटांनी नुकसान झाले. अमेरिकेतही भीषण उष्णतेमुळे जंगलात वणवा पेटला. तसेच पूरही आला. या सर्वांसाठी हवामान बदल कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

इजिप्तमध्ये का होत आहे COP27 परिषद?

हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून आफ्रिका जगातील सर्वात संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पूर्व आफ्रिकेतील दुष्काळामुळे 1.7 कोटी जनता अन्नधान्याच्या तुटवड्याचा सामना करत आहे. त्यामुळे आफ्रिक देशात क्लायमेट चेंज समिट आयोजित करून या प्रश्नांवर जगाचे लक्ष्य खेचण्यास मदत मिळेल. आफ्रिक देशांत ही परिषद होण्याची यंदाची ही 5 वी वेळ आहे.

बातम्या आणखी आहेत...