आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:जागरूकतेमुळे अमेरिकेत 35%, जगभरात बाधितांत 30 टक्के घट, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचाही परिणाम कमी

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन महिन्यांत कोणत्याही देशात मोठा संसर्ग नसल्याचा वैज्ञानिकांचा दावा

कोरोनाचे उच्चाटन झालेले नसले तरी त्याची तीव्रता कमी झाल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांत रुग्णालयांतील बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. अमेरिकेत एक सप्टेंबर रोजी रुग्णांचे दाखल होण्याचे प्रमाण ३५ टक्के कमी होते. गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत जगभरात रुग्णांचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले. स्क्रिप रिसर्चचे डाॅ. एरिक टोपल म्हणाले, अमेरिकेतील रुग्णांचे प्रमाण आणि त्याचा पॅटर्न पाहता येऊ शकतो. डेल्टा व्हेरिएंटमुळे अमेरिकेत बाधितांची संख्या गेल्या वर्षी वाढली होती. प्रमाण कमी होण्यामागे अद्याप अचूक तर्क उपलब्ध नाही. परंतु मिनिसोटा विद्यापीठाचे प्रो. मायकेल ऑस्टरहोम म्हणाले, जगभरातील लसीकरण मोहीम, लोकांतील कोरोनासंबंधीची जागरूकता वाढली आहे, हेदेखील बाधित कमी होण्यामागील कारण आहे.

न्यूझीलंडने झीरो कोविड मॉडेल साेडले
न्यूझीलंडने झीरो कोविड मॉडेलला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशी स्थिती तूर्त तरी दिसून येत नाही. म्हणूनच लोकांनी दक्षता बाळगली पाहिजे. कोरोनासोबत जगले पाहिजे. महामारीची धास्ती घेण्यापेक्षा नियमांचे पालन करायला हवे.

कोरोनाच्या मोठ्या लाटेचा काळ लोटला?
कोरोनाच्या मोठ्या लाटेचा काळ लोटला आहे का, यावर आता वैज्ञानिकांत चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाची मोठी लाट गेल्या दोन दिवसांत जगभरातील कोणत्याही देशांत दिसून आली नाही. ब्रिटनमध्ये गेल्या दोन महिन्यांच्या काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसले.

भरती होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले
अमेरिकेत १ सप्टेंबर २०२१ नंतर कोरोना रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी झाले. सोबतच २० सप्टेंबरनंतर मृत्यूचा आकडाही कमी झाला. अमेरिकेत मृत्युदर १० टक्क्याहून कमी झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम आता कमी होत चालला आहे. भारत, इंडोनेशिया, थायलंड, फ्रान्स व स्पेनमध्येही कोरोनाच्या बाधित व मृतांत घट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...