आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दावा:गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच चीनमध्ये कोरोना पसरला, हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनात दावा

लंडन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातच सुरू झाला होता, असा दावा हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनात करण्यात आला आहे. तथापि, चीनने ३१ डिसेंबरला याबाबत जगाला माहिती दिली होती.

संशोधन करणाऱ्या पथकाने कमर्शियल सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने वुहान शहरातील काही छायाचित्रांवर संशोधन केले आहे. ही छायाचित्रे २०१९ मधील ऑगस्ट आणि त्यापूर्वीच्या एक वर्षाआधीचे आहे. यात वुहान शहरातील रुग्णालयांबाहेर मोठ्या संख्येने वाहने उभी असल्याचे दिसत आहे. यापूर्वीच्या महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये रुग्णालयांबाहेर अशा प्रकारची गर्दी केवळ संसर्ग पसरल्यावरच दिसत होती. संशोधनानुसार, चीनमध्ये या कालावधीतच कोरोनाचा विषाणूचा प्रसार सुरू झाला होता. ऑगस्टमध्येच वुहानमध्ये पाच मोठ्या रुग्णालयांबाहेर वाहनांची गर्दी होणे संशयास्पद आहे. दरम्यान हवामान बदल, सर्दी खोकला आणि डायरियाचे रुग्ण समजून यांच्यावर उपचार झाले असतील, असे संशोधकांंनी म्हटले आहे.

चीनमधून भारतात कोरोना आला नाही : आयआयएसी

जगभरात कोरोनाच्या प्रसारासाठी चीनला जबाबदार मानले जात आहे. मात्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, भारतात कोरोनाचा विषाणूचा प्रसार चीनमधून सुरु झालेला नाही. तर युरोप, ओशिनिया आणि दक्षिण आशियाई देशांमधून सुरु झालेला आहे.

अमेरिकेत ऑगस्टपर्यंत सुमारे १.४५ लाख मृत्यू शक्य : 

अमेरिकेत ऑगस्टपर्यंत १.४५ लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असा दावा वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...