आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना:मुले माेठ्या प्रमाणात कोरोनाचे कॅरियर शक्य, नवीन संशोधनामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हाेऊ शकते संभ्रमाची स्थिती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्वासमार्गात 100 पट जास्त विषाणू

अपूर्व मंडाविली
लाॅकडाऊनच्या काळात शाळा पुन्हा खुल्या करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच कोरोना विषाणूचा लहान मुलांना फटका बसला नाही, ही बाब दिलासा देणारी ठरली. लहान मुलांमुळे त्याचा प्रादुर्भाव हाेत नाही. अशी प्रकरणे कमी असल्याचे आतापर्यंत वाटत हाेते. परंतु, गुरुवारी नवे संशाेधन ही धारणा बदलवू लागले आहे. लहान मुले कोरोना विषाणूचे कॅरियर असल्याचे संशाेधनातून दिसून आले आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे. परंतु, अशी मुले बाधित राहून इतरांना बाधित करू शकतात का हे सिद्ध झाले नाही. तज्ञांच्या या दाव्याने शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतची चर्चा सुरू हाेऊ शकते.

जेएएमए पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित या अध्ययनाचे प्रमुख व शिकागाेे एन अँड राॅबर्ट एच. लाॅरी चिल्ड्रन्स हाॅस्पिटलचे संसर्गजन्य राेग तज्ञ डाॅ. टेलर हेल्ड-सार्जेंट म्हणाल्या, शाळांची स्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली आहे. कारण त्यातून अनेक वैज्ञानिक बाबी समाेर येत आहेत. मुले आजारी किंवा खूप आजारी पडत नाहीत. म्हणून त्यांच्यात विषाणू नाही, हे असे आपल्याला गृहित धरता येऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले. या अभ्यासात काेराेनाबाधित १४५ लाेकांच्या स्वॅबचे विश्लेषण करण्यात आले. त्यात ४६ मुले ५ वर्षांहून कमी वयाची आहेत. ५१ मुले १७ वर्षांची व १८ ते ६५ वर्षांच्या ४८ लाेकांचे स्वॅब घेण्यात आले हाेते. आॅक्सिजन देण्याची गरज असलेल्या मुलांचा यात समावेश नाही. बहुतांश मुलांमध्ये ताप, खाेकल्याची लक्षणे हाेती. तपासणी केली असता इतरांच्या तुलनेत मुलांमध्ये विषाणू जास्त संख्येने हाेते. सेंट जूड चिल्ड्रन रिसर्च हाॅस्पिटलचे एक व्हायराॅलाॅजिस्ट स्टेसी शुल्ज चेरी म्हणाल्या, मुले अतिसंवेदनशील नसतात किंवा मुले बाधित हाेत नाहीत, हे मी अनेकांकडून एेकले. परंतु, हे खरे नाही. मुलांची स्थिती नेमकी कशी, हे समजून घेण्यासाठी संशाेधन महत्त्वाचे ठरेल. युनिव्हर्सिटी आॅफ मॅनिटाेबाचे व्हायराॅलाॅजिस्ट जेसन किंडरचूक म्हणाले, शाळेबाबत फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

श्वासमार्गात 100 पट जास्त विषाणू
काेराेनाबाधित मुलांच्या नाक, गळ्यात एखाद्या तरुण बाधित व्यक्तीएवढेच विषाणू असू शकतात, असे हे संशाेधन सांगते. श्वासनलिकेत देखील तरुण व्यक्तीच्या तुलनेत १०० पट जास्त विषाणू असू शकतात. लहान मुले काेराेनाचे माेठे कॅरियर हाेऊ शकतात. त्यामुळे तज्ञांची चिंता वाढली आहे.