आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर नियंत्रण कसे मिळवायचे:युद्धपातळीवरील लसीकरणाने बदलले अमेरिकेचे चित्र, विनामास्कची दिली मुभा

न्यूयॉर्क (मोहंमद अली)13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेला ३ महिन्यांपूर्वी काेविडची स्थिती महाप्रलयासारखी वाटत हाेती, अाता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात अाली

काेराेना संसर्गाचा सर्वात खडतर टप्पा अाता अमेरिकेने पार केला अाहे. याचे कारण म्हणजे ट्रम्प प्रशासनाच्या काळात केलेल्या चुकांमधून धडे घेत बायडेन प्रशासनाने झटपट कृती करत हा संसर्ग नियंत्रणात अाणला अाहे. बायडेन यांनी २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली त्या वेळी त्यांनी लसीकरणाला संजीवनीच्या रूपाने स्वीकारले, असे तज्ज्ञांचे मत अाहे. जगाच्या तुलनेत सर्वात वेगाने लसीकरण माेहीम राबवल्याने काेविडमुळे हाेणारे मृत्यू अाणि नवीन प्रकरणे घटली अाहेत. बायडेन यांनी देशात लस उत्पादन जास्त गतिमान केले. १०० दिवसांत १०० दशलक्ष डाेस उत्पादनाचे बायडेन यांचे लक्ष्य पुरे करू शकणार नाही, असे माॅडर्ना अाणि फायझरसारख्या लस कंपन्यांनी सुरुवातीला म्हटले हाेते. म्हणूनच बायडेन यांनी देशाबाहेर कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्यासाठी कायदे केले; जेणेकरून लसीचे उत्पादन युद्धपातळीवर होऊ शकेल. त्यानंतर बायडेन यांनी १०० दिवसांचे लक्ष्य दुप्पट करून २०० दशलक्ष केले अाणि हे लक्ष्य नियाेजित तारखेच्या अाधी एका अाठवड्यातच पूर्ण केले. लाेकांचे लसीकरण करून अमेरिकेने विषाणू नियंत्रित करण्यात इतका सक्षम झाला अाहे की राेग नियंत्रण अाणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) अाता दाेन डाेस घेतलेल्यांना मास्कच्या बंधनातून मुक्त केले अाहे. लहानशा समूहातही हे लाेक जाऊ शकतात.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ४ जुलै हा काेविड मुक्ती दिन जाहीर केला अाहे. संपूर्ण लाेकसंख्येचे पूर्ण लसीकरण हे या दिवसाचे लक्ष्य असेल. सीडीसीचे संचालक रचेल व्हॅलेन्स्की म्हणाल्या, काेविड-१९च्या संसर्गात झपाट्याने घसरण झाल्याचे अाम्हाला दिसत अाहे. गतिमान लसीकरण कार्यक्रम हेच त्याचे एकमेव कारण अाहे. अाश्चर्य म्हणजे ३ महिन्यांपूर्वी लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा व्हॅलेन्स्की यांनी कोविडमुळे माेठ्या प्रमाणावर अापत्ती येण्याचा इशारा दिला हाेता. अमेरिकेतील भारतीय अमेरिकन शल्यचिकित्सक डॉ. विवेक मूर्ती यांनीही या यशाच्या मागे युद्धपातळीवरील लसीकरण असल्याचे सांगितलेे. या विषाणूमुळे अमेरिकेत ३.२ काेटी लोकांना संसर्ग झाला. ५.७ लाख लोकांना जीव गमवावा लागला.

निम्म्यापेक्षा जास्त राज्यांत सुधारणा, तीन महिन्यांत नवीन प्रकरणे, मृत्यू, रुग्णालय भरती; सर्वात घट
गेल्या दोन आठवड्यांमध्ये अमेरिकेतल्या निम्म्याहून अधिक राज्यांत महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्याचे दिसून येत अाहे. बुधवारपर्यंत अमेरिकेत राेज सरासरी ५४ हजार नवीन प्रकरणे अाली, जी त्याअाधीच्या अाठवड्याच्या तुलनेत २४ % कमी अाहेत. व्हर्जिन आइसलँड, कोलंबियासह ११ राज्यांत या काळात ३० % घट झाली. रुग्णालय भरतीत ९ % घट झाली अाहे. या प्रकरणात ७ दिवसांची सरासरी ५,१०० अाहे. मृतांमध्ये ६% घट झाली अाहे.

मदत : ७५ हजार डाॅलरपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या १६ काेटी कुटुंबांना अार्थिक मदत
ट्रम्प अाणि बायडेन यांनी संपूर्ण वर्षभरात अनेक ट्रिलियन डाॅलर देऊन अमेरिकन नागरिकांना मदत केली. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी ९०० अब्ज डाॅलरचे पॅकेज दिले. बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर १.९ ट्रिलियन डाॅलर मदत देण्याची घाेषणा केली. वार्षिक ७५ हजार डाॅलरपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या १६ काेटी कुटुंबांना १,४०० डाॅलर अाणि प्रत्येक सदस्याच्या हिशेबाने ५०० डाॅलर दिले.

मूर्ती यांनीही या यशाच्या मागे युद्धपातळीवरील लसीकरण असल्याचे सांगितलेे. या विषाणूमुळे अमेरिकेत ३.२ काेटी लोकांना संसर्ग झाला. ५.७ लाख लोकांना जीव गमवावा लागला.

९२% लोकांना वेळेवर मिळाला दुसरा डोस
युद्धपातळीवर लसीकरणाचा फायदा म्हणजे अातापर्यंत पहिली लस घेतलेल्या ९२ टक्के लाेकांनी दुसरी लसही वेळेवर घेतली अाहे. पहिला डाेस शरीरात काेविड विषाणूशी लढण्यासाठी प्रथिने उत्पन्न करताे अाणि दुसरा डाेस प्रतिकारशक्तीची संरक्षक ढाल तयार करताे, असे तज्ज्ञांचे मत अाहे. सॅन फ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संसर्ग रोगतज्ज्ञ मोनिका गांधी म्हणतात, ९२ % टक्के लोकांनी दुसरा डाेस वेळेवर घेतला ही सर्वात महत्त्वाची गाेष्ट अाहे.

राेज ३३ लाख लाेकांचे लसीकरण, अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांनादेखील लस
लसीकरण माेहिमेनेवेग पकडला असून अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांनाही काेणताही दस्तएेवज न बघता लाेकांना लस देण्यात येत अाहे. अमेरिकेत राेज ३३ लाख लाेकांना लस देण्यात येत अाहे. अातापर्यंत १३.३ काेटी प्राैढ वा ५५ % लाेकसंख्येने कमीत कमी एक डाेस घेतला अाहे. जवळपास ४०% लाेकसंख्येने दाेन्ही डाेस घेतले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...