आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकट:अमेरिकेत कोरोनामुळे 1.7 कोटी लोकांसमोर खाद्यान्न संकट; 60 हजार संस्था, दोन लाख स्वयंसेवक पोहोचवताहेत जेवण

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन महिन्यांत अमेरिकेत 46% वाढली उपाशी राहणाऱ्यांची संख्या, 5.5 लाख लोक संकटात

अमेरिका कोरोनामुळे जगभरात सर्वाधिक प्रभावित देश आहे. १३ लाखांपेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. ८० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झालेत. कोरोनामुळे दोन महिन्यांत सुमारे १.७ कोटी लोकांसमोर खाद्यान्न संकट उभे ठाकले आहे. दोन महिन्यांत ही संख्या सुमारे ४६% वाढली आहे. अमेरिकेत कोरोना आणि इतर कारणांनी उपाशी राहणाऱ्या लोकांची संख्या साडेपाच कोटी झाली आहे. अशात अन्नसुरक्षा आणि उपासमारीवर काम करणारी राष्ट्रीय संघटना फीड अमेरिका लोकांपर्यंत जेवण पोहोचवत आहे. फीड अमेरिकेचे सीईओ कॅटी फिजगेराल्ड यांनी सांगितले, कोरोनाचे वाढते रुग्ण बघता वाटते की, स्थिती आमच्या नियंत्रणातून बाहेर गेली आहे. अशा स्थितीत कोणीही अन्न सुरक्षेच्या संकटात सापडू शकतो. स्थिती भयानक होऊ शकते. अशा लाेकांची संख्याही वाढतेय ज्यांच्या समोर खाण्या-पिण्याचे संकट आले आहे.

कोरोनाच्या आधी अमेरिकेत ३.७ कोटी लोक या संकटाचा सामना करत होते. कोरोना, बेरोजगारीमुळे केवळ दोन महिन्यांत यात १.७ कोटी लोक आणखी वाढले. म्हणजे सध्या सुमारे साडेपाच कोटी लोक संकटात आहेत. सध्या सर्वात मोठे आव्हान आहे की, आमच्याकडे तेवढे अन्न नाही जेवढे आमच्या अन्न बँकेची मागणी पूर्ण करण्यासाठी हवे. आता ३०% जास्त लाेकांना मदत हवी. यात बहुतांशी असे आहेत ज्यांनी आयुष्यात कधीच खाण्या-पिण्यासाठी मदत मागितलेली नाही. खाद्यपदार्थ सांभाळून ठेवण्याची ही वेळ आहे.

६० हजार संस्थांद्वारे पोहोचवली जाते मदत

फीड अमेरिका ६० हजार संस्थांद्वारे जेवण पोहोचवत आहे. २०० फूड, दोन लाख स्वयंसेवक मदत करत आहेत. न्यू रिपोर्टिंग सिस्टम, वेबिनार आणि तंत्रज्ञानाद्वारे वेळच्या वेळी मदत दिली जात आहे. यातून गरजूंचे लोकेशन शेअर केले जाते. मग टीम लगेच पोहोचून मदत करते.

बातम्या आणखी आहेत...