आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona | Children Effect | Lockdown | Because Of Corona, The Children Began To Understand The Family's Plight; Loneliness, Anger In Children Due To Epidemic

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुळे मुले कुटुंबाची अडचण इशाऱ्याने समजू लागली; महामारीमुळे मुलांत एकटेपणा, संताप

जेसी फॉर्टिन, ज्युलिया हेवई | न्यूयॉर्क4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना महामारीने जगाला हादरून टाकले आहे. मुलांच्या मनावर त्याचा खाेलवर परिणाम झाला आहे. २०२० मध्ये मुले बहुतांश वेळ घरात जणू कैद राहिली. २०२० नंतर शाळेत जायला सुरुवात हाेताच पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने त्यांची शाळा बंद झाली. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड, एकलकोंडेपणा आणि अपयशी हाेण्याची भावना वाढीस लागली. याच टप्प्यातून साेळावर्षीय कायला चेस्टर ऑपकिन्सलाही जावे लागत आहे. कायला अमेरिकेच्या मिलवाॅकीच्या उच्च माध्यमिक शाळेत शिकते. २०२० मध्ये तिला अनेक महिने घरात कैद राहून ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले.

एक वर्षानंतर नियमितपणे शाळेला जाऊ लागताच तिला संसर्ग झाला. माझ्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याचा विचार ती करू लागली. तिला खूप भीती वाटू लागली. तिला धाकटे चार भाऊ-बहिणी आहेत. या चिंतेतूनच तिने जानेवारीत शाळेत जाणे बंद केले. तिची सर्वात चांगली मैत्रीण आपल्यामुळे बाधित झाली याचे तिला खूप दु:ख हाेत हाेते. घरातच राहावे लागत हाेते. तिच्यात एक चित्रकार दडलेला हाेताा. हा कलाकार या काळात बाहेर आला. तिने घराच्या भिंतीवर चित्रकृती साकारल्या. तिने म्यूरल पेंटिंग साकारली. अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या तिच्या समवयीन मुलांत मात्र नकारात्मक भावना वाढल्याचे दिसते. माेठ्या माणसांऐवजी त्यांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपल्याला ठेवण्यात आले आहे. मोठ्यांनी स्वत:ची जबाबदारी ढकलून दिली आहे, असे तिला वाटू लागले आहे. व्यवस्थेने सगळा बट्ट्याबाेळ केल्याचे काही मुलांना वाटते.

​​​​ऑनलाइन अभ्यासाबराेबरच गेमिंगमुळेही विचलित

घरात ऑनलाइन अभ्यास व गेमिंगमुळेही मुले विचलित हाेत आहेत. गेल्या वेळी शाळा सुरू झाली तेव्ही ही बाब अनेक मुलांसाठी दिलासादायक हाेती. डेट्राॅइटमधील सागरी जीवशास्त्राचा विद्यार्थी जाॅर्डन स्पेन्सरलाही शाळा सुरू झाल्याचा आनंद हाेता. त्याने अभ्यास चांगला केला. परंतु प्रत्यक्ष शाळेत शिकण्याचा अनुभव त्याला मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...