आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:कोरोनावर ट्रम्प सरकारचा बचावही नाही करू शकले पेन्स, कमलाही कोंडी करण्यात ठरल्या असमर्थ !

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या उपाध्यक्षस्तरीय डिबेटमध्ये पेन्स-कमला यांच्यात कोण ठरले वरचढ, वाचा

कॅलिफोर्नियात बुधवारी रात्री विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स व भारतवंशीय डेमोक्रॅटच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात पहिली उपराष्ट्राध्यक्षस्तरीय वादविवाद रंगला होता. व्हाइट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचलेला कोरोना या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर डिबेटमध्ये दोन्ही उमेदवार १२ फुटांच्या अंतरावर बसले. त्यांच्यात काचेची भिंत लावलेली होती. या गोष्टी बायडेन टीमच्या सूचनेनुसार करण्यात आल्या. सॉल्टलेक सिटीच्या उटाह विद्यापीठाच्या मंचावर झालेल्या या डिबेटमध्ये गेल्यावेळच्या राष्ट्राध्यक्षांच्या डिबेटच्या तुलनेत उपराष्ट्राध्यक्षपदाचे यंदाचे उमेदवार सभ्य दिसून आले. वास्तविक उभयतांनी या चर्चेत वेळेचा नियम मोडला. कुत्सित हास्य, डोळे फिरवणे, नाराजीसह परस्परांना उत्तरांद्वारे जोरदार प्रतिक्रिया दिल्या. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही नेत्यांनी परस्परांवर वैयक्तिक हल्ले करणे टाळले आणि निवडणूक मुद्द्यांवर ठाम राहिले. हॅरिस व पेन्स दोघांनी एक गोष्ट सांगितली. प्रतिस्पर्धी विजयी झाल्यास अमेरिकेचे भवितव्य अंधारात जाईल. हॅरिस यांनी आेबामा केअरचा उल्लेख करताना ट्रम्प ही योजना परवडत नसल्याने गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. वास्तविक या योजनेमुळे अमेरिकेतील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचू शकल्या आहेत, असा दावा कमला यांनी केला. पेन्स यांनी मात्र आेबामा केअर एखाद्या वादळाहून कमी नव्हता आणि अमेरिकी लोकांना त्याची जाणीव होती असे सांगितले. कोरोनाचा निपटारा करण्यात अपयशी राहिल्याबद्दल हॅरिस यांनी ट्रम्प प्रशासनावर टीका केली.

पेन्स यांनी सरळ उत्तर न देता चीनला जबाबदार ठरवले. दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प चीनसोबतचे संबंध कसे सुधारणार, असा प्रश्न करण्यात आला. तेव्हा पेन्स म्हणाले, संबंध चांगले व्हायला हवेत. परंतु आम्हाला समानता हवी आहे. कोरोना विषाणूने जे काही घडले त्यास चीन जबाबदार आहे. ही गोष्ट चीनने स्वीकारली पाहिजे. आमच्यासाठी अमेरिकी नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. वर्षाखेरीस सर्व अमेरिकींना विषाणू मिळेल. त्यावर कमला हॅरिस म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांनी एखादी लस मला घ्यायला सांगितली तर मी जरूर घेईन, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी लस घेण्यास सांगितल्यास मी घेणार नाही. दुसरीकडे पेन्स यांना थेट प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी भलतेच उत्तर दिले. अमेरिकेत इतर देशांच्या तुलनेत मृत्युदर २.५ टक्के जास्त का ? असा प्रश्न केला. त्यावर पेन्स यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या चीनसोबतच्या निर्बंधावर आपली मते मांडली. जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था चीनसोबत ट्रम्प यांनी सर्व प्रवासी संबंध तोडले आहेत. मात्र तज्ञांनी पेन्स यांचे दावे फेटाळले आहेत.

कमलांनीही अनेक प्रश्नांना टाळले... सुप्रीम कोर्टात जज नियुक्तीबाबत मौन बाळगले..चर्चेदरम्यान पेन्स यांच्याप्रमाणेच हॅरिस यांनीही कडक व थेट प्रश्नांना बगल दिल्याचे दिसले. बायडेन प्रशासन निवडणुकीच्या आधी रिपब्लिकनला उत्तर देण्यासाठी सुप्रीम कोर्टासाठी जजचे नामांकन करतील? या प्रश्नावर हॅरिस यांनी उत्तर देणे टाळले. हॅरिस यांच्या कॅलिफोर्नियात सरकारी वकिलीच्या कारकीर्दीवर पेन्स यांनी हल्ला केला. त्याबाबतही हॅरिस यांनी थेट उत्तर दिले नाही.

चीनसंबंधाबाबत मूग गिळून : कोरोनाबद्दलची जबाबदारी स्वीकारण्यास चीनला भाग पाडू
दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प चीनसोबतचे संबंध कसे सुधारणार, असा प्रश्न करण्यात आला. तेव्हा पेन्स म्हणाले, संबंध चांगले व्हायला हवेत. परंतु आम्हाला समानता हवी आहे. कोरोना विषाणूने जे काही घडले त्यास चीन जबाबदार आहे. ही गोष्ट चीनने स्वीकारली पाहिजे. त्यासाठी चीनला तयार करू. चर्चेत पेन्स यांनी चीनवर ट्रम्प यांनी केलेल्या हल्ल्याचा वारंवार उल्लेख केला.

ट्रम्प कॅम्पेनने कमलांची खिल्ली उडवली : रॅपर टुपेक शकूरसाठी जागा केली राखीव
चर्चा सुरू होण्यापूर्वी ट्रम्प कॅम्पेनने पत्रकारांशी संवाद साधला. या चर्चेसाठी टुपेक शकूरचा तिकिट राखीव ठेवले आहे. प्रसिद्ध रॅपर टुपेक यांची १९९५ मध्ये गोळी मारून हत्या झाली होती, असे सांगून कमला हॅरिस यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न झाला. कारण २०१९ मध्ये कमला यांनी आवडते हयात कलाकार म्हणून टुपेक यांचे नाव सांगितले होते. त्यावर कमलांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.

कोरोना व्हाइट हाऊसपर्यंत कसा पोहोचला? ..पेन्स गप्प राहिले
ट्रम्प यांची धोरणे स्वत:ला सुरक्षित ठेवण्यातही अयशस्वी ठरली. असे का? व्हाइट हाऊसने उपचार सोडून आलेले बाधित ट्रम्प, पत्नी मेलानिया, सिनेटर व स्टाफला प्रवेशाची परवानगी कशी दिली? असा कडक प्रश्न हॅरिस यांनी जोडून विचारला. चर्चेदरम्यान दोन्ही उमेदवारांनी विचारांऐवजी तथ्यांवर आदान-प्रदान केली. अमेरिकेच्या इतिहासात एवढे वाईट व नतद्रष्ट राष्ट्राध्यक्ष प्रशासन पाहिले नव्हते, असे सांगून हॅरिस यांनी पेन्स यांच्यावरही टीका केली. कोरोना विषाणूच्या उच्चाटनासाठी स्थापन विशेष दलाचे पेन्स हे प्रमुख आहेत. पेन्स यांनी जनतेशी खोटेपणा केला आहे. काय होणार आहे याची पेन्स यांना कल्पना होती, परंतु त्यांनी याबद्दलची माहिती दडवली. सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या.