आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाँगकाँगमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने झीरो कोविड धोरण लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने आता खाटा शिल्लक नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. वॉर्डांत जागा नसल्याने बाधितांना रुग्णालयाबाहेर लॉन किंवा प्रतीक्षालयात ठेवण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हाँगकाँगच्या सर्वात गरीब जिल्ह्यातील शाम शुई पोच्या कारिटास मेडिकल सेंटर येथे ४० हून जास्त वृद्धांना उपचारासाठी रांगेत तिष्ठत बसावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. थंडीमुळे ज्येष्ठांचा त्रास वाढला आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यातील आयसोलेशन कक्षात मुलांसह मोठ्यांनाही बसण्याची वेळ आली आहे. कारण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने उशिरापर्यंत त्यांची तपासणीदेखील होऊ शकली नाही. बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचा हाँगकाँगमध्ये कडक नियम आहे. परंतु एक आठवड्यापासून दररोज दुप्पट संख्येने बाधित दाखल होत आहेत. बुधवारी ४ हजार २८५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. प्रशासनाला धोरणात बदल करावा लागणार आहे.
नियंत्रणासाठी पावले टाका : जिनपिंग
हाँगकाँगमध्ये रुग्णसंख्या वाढल्याची माहिती मिळाल्यावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी स्थानिक सरकारला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले टाकावी, असे सूचना केली आहे. हाँगकाँगला महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर पहिल्यांदा सर्वात वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.