आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासानुसार सिंगापूरच्या ६२ टक्के नागरिकांना विना पश्चात्ताप सुखी आयुष्य जगायला आवडते. शेवटच्या दिवसांतील आजारपण किंवा मृत्यू यामुळे कुटुंबातील सदस्यांवर आर्थिक ताण पडता कामा नये, असे लोकांना वाटते. ते आपल्या कुटुंबीयांसमक्ष शेवटचा श्वास घेऊ इच्छितात. वेदनेतून सुटका मिळवू इच्छितात. हे लक्षात घेऊन डॉ. चिया लिंगयी यांनी लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याचे नवे काम हाती घेतले आहे.
कोरोनाकाळात लोकांमध्ये अजूनही प्रचंड चिंता दिसून येत आहे. या काळात आपल्यासोबत काही घडल्यास कुटुंबीयांचे कसे होईल, अशी चिंता त्यांना वाटू लागली आहे. सिंगापूरमधील लोकांमध्ये हे जास्त दिसून येत आहे. वृद्धच नव्हे तर येथील तरुण, तंदुरुस्त लोकही जीवनातील शेवटची इच्छा म्हणून मृत्युपत्र तयार करू लागले आहेत. ते नातेवाइकांना शेअर करू लागले आहेत. काही बरे-वाईट घडलेच तर यातून कुटुंबीयांना तेवढीच मदत होऊ शकेल.
त्यांची देखभाल कशी केली जावी याची त्यांना पुरेपूर कल्पना मिळेल, अशी त्यांची भावना आहे. मृत्युपत्र लिहून ठेवण्याच्या या नव्या ट्रेंडनुसार मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असलेला २८ वर्षीय डोरेन टॅन म्हणाला, गंभीर स्वरूपातील आजाराच्या स्थितीत कोणत्याही अडचणीपासून बचावासाठी मृत्युपत्र तयार करून घेत आहे. त्यामुळे कुटुंबीयांचे हाल होणार नाहीत.एका जपानी कंपनीत अकाउंटंट असलेल्या ३८ वर्षीय मॅट पालेकने लास्टिंग पॉवर ऑफ अॅटर्नी लिहिले आहे. सामुदायिक केंद्रात अॅडव्हान्स केअर प्लॅनिंग (एसीपी) पूर्ण केले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी काही मित्र व नातेवाइकांचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे यंदा मृत्युपत्राबाबत विचार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. एसीपी भविष्यातील आरोग्य व खासगी देखभालीची योजना आहे. त्यात उपचार व प्राधान्यक्रम ठरवला जातो. त्यामुळे डॉक्टर व नातेवाइकांना याबद्दलची माहिती होेते. त्यात संपत्तीचे वितरण, तपशील आणि महत्त्वाचे म्हणजे वारसदाराचे नाव इत्यादीची माहिती नमूद केलेली असते. साता हेल्थकॉम या धर्मादाय संस्थेनुसार एलपीएल, एसीपीमध्ये ५० वर्षांहून कमी वयाच्या लोकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत आठपटीने वाढली आहे. ५० पेक्षा जास्त वयोगटातील संख्या २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये वाढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.