आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona Death : The Highest Number Of Coronal Deaths In The United States Is Among Citizens Under The Age Of 55

महामारीचा कहर:अमेरिकेत कोरोनामुळे मृतांमध्ये 55 पेक्षा कमी वयाचे सर्वाधिक नागरिक; सात लाख मृत्युमुखी, अडीच महिन्यांत एक लाखावर

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवी ओरल लस : मृत्यूचा धोका ५० टक्के कमी करणार मोलनुपिराविर

अमेरिकेत कोरोनाचा कहर सातत्याने वाढत आहे. महामारीमुळे आतापर्यंत सात लाख १८ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सर्वाधिक लसीची उपलब्धता असलेल्या देशात कोरोनामुळे मृत्यू होत असल्याने सर्व प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह लागले आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांत ५५ वर्षांहून कमी वयाच्या लोकांचा समावेश आहे. गेल्या अडीच महिन्यांच्या काळात अमेरिकेत एक लाख लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेने अलीकडे ६५ प्लस लोकांना लसीच्या तिसऱ्या डोससाठी परवानगी दिली आहे. अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग व मृतांचे प्रमाण वेगाने वाढले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे हावर्ड मार्केल म्हणाले, डेल्टा व्हेरिएंटचा लस न घेणाऱ्या लोकांना मोठा फटका बसला आहे. आकडेवारीनुसार कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांनी लस घेतलेली नव्हती.

नवी ओरल लस : मृत्यूचा धोका ५० टक्के कमी करणार मोलनुपिराविर
मार्क अँड कंपनीचे आेरल आैषध मोलनुपिराविर गंभीर रुग्णांचा मृत्यू टळू शकते. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज ५० टक्के कमी करते. अंतिम परीक्षणात या लसीचे परिणाम अतिशय चांगले आल्याचा दावाही कंपनीने केला आहे. मार्क आपल्या भागीदार कंपनी रिजबॅक बायोथेरेप्युटिक्ससोबत अमेरिकेत त्याचा इमर्जन्सी वापराचा अधिकार मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण बाहेरील तज्ज्ञांमार्फत केले जाईल. कंपनी वर्षअखेरीस एक कोटी डोस तयार करणार आहे.

लस घेणाऱ्या लाखापैकी तीन हजार जणांचा मृत्यू
आरोग्य संस्था सीडीसीनुसार जूननंतर मृत्युमुखी पडलेल्यांत एक लाख लोकांपैकी सुमारे ३ हजार लोकांनी लस घेतलेली होती. सप्टेंबरमध्ये प्रकाशित सीडीसीच्या अहवालानुसार अमेरिकेत कोरोना संसर्गाचे भौगोलिक बदल दिसून आले

दररोज दोन हजारांवर मृत्यू
अमेरिकेत कोरोनामुळे सप्टेंबरअखेरपासून दररोज सरासरी दोन हजार जणांचा मृत्यू होत आहे. फेब्रुवारीनंतर हे दिसून आले आहे. २२ फेब्रुवारीत ही नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...