आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:न्यूयॉर्कमध्ये कोरोनाने मृत्यूंचा आकडा घटला, मात्र 20 राज्यांत संसर्ग वेगाने

वॉशिंग्टन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तान : 24 तासांत सर्वाधिक 6 हजार 825 रुग्ण

अमेरिकेच्या न्यूयाॅर्कमध्ये काेराेनामुळे एका दिवसात सर्वात कमी ३२ जणांचा मृत्यू झाला. न्यूयाॅर्कचे गव्हर्नर अँड्रयू क्यूमाे यांनी त्यास दुजाेरा दिला आहे. ही सुवार्ता म्हटली पाहिजे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळत असल्याचे त्यावरून स्पष्ट हाेते. परंतु, देशातील इतर २० राज्यांत संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे, असे त्यांनी सांगितले. कॅलिफाेर्निया, फ्लाेरिडा, टेक्सासमध्ये दिवसभरात हजाराे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पश्चिमेकडील क्षेत्रात मंगळवारपासून अनलाॅक-४ सुरू हाेईल. वाॅशिंग्टनमध्ये बुधवारपासून अनलाॅक-३ लागू केला जाऊ शकताे. न्यूयाॅर्कमध्ये सध्या अनलाॅक-१ लागू आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार ४ जुलैपर्यंत देशात १.४० लाखावर मृत्यू हाेतील. त्यापैकी सर्वात मृत्यू अॅरिझाेना, अर्कंसास, हवाई, नाॅर्थ कॅराेलिना, उटा येथे सर्वाधिक लाेक मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे. येथे चाेवीस तासांत विक्रमी रुग्णांची संख्या नाेंदवण्यात आली. फ्लाेरिडात २४ तासांत सर्वाधिक १९०२ रुग्ण आढळले.

चीन : नियंत्रणाच्या दाेन महिन्यांत सर्वाधिक ६६ रुग्ण

बीजिंग |चीनमध्ये काेराेनावरील नियंत्रणाच्या दाेन महिन्यांनंतर सर्वाधिक ६६ रुग्ण आढळून आले आहेत. राष्ट्रीय आराेग्य आयाेगाचे (एनएचसी) अधिकारी म्हणाले, राजधानी बीजिंगमध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कारण आढळून आलेल्यांपैकी ३६ रुग्ण बीजिंगमधील आहेत. बीजिंगच्या सहा बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तान : २४ तासांत सर्वाधिक ६ हजार ८२५ रुग्ण

इस्लामाबाद | पाकमध्ये २४ तासांत काेराेनाचे सर्वाधिक ६ हजार ८२५ रुग्ण आढळून आले. रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार २३० झाली आहे. २ हजार ६३२ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक फटका पंजाब व सिंध राज्यांना बसला असून रुग्णांची संख्या प्रत्येकी ५० हजार पार झाली आहे. पंजाबमध्ये ५२ हजार ६०१ व सिंधमध्ये ५१ हजार ५१८ रुग्णसंख्या आहे.

बातम्या आणखी आहेत...