आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona Does Not Directly Affect Taste Ability, Researchers Did Not Found ACE2 Receptor In Taste Cells

कोरोना संशोधनात दावा:चवीच्या क्षमतेला थेटपणे प्रभावित करत नाही कोरोना, संशोधकांना चवीच्या पेशींमध्ये एसीई2 रिसेप्टर आढळले नाही

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 20-25% कोरोना विषाणूचे रुग्ण चवीबाबत तक्रार करतात

थेटपणे चवीच्या पेशींचे नुकसान करत नाही तर आजारपणात इन्फ्लेमेशनमुळे रुग्णाला कोणतीही चव लागत नाही. हे संशोधन एसीएस फार्मेकोलॉजी अँड ट्रान्सलेशनल सायन्स मासिकात प्रसिद्ध झाले आहे. यातील निष्कर्ष मागील संशोधनाच्या विपरीत आहे, त्यात म्हटले होते की, कोरोना चवीच्या क्षमतेवर थेट परिणाम करतो. कोरोना रुग्णांनी मोठ्या प्रमाणात वास किंवा चव येत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर संशोधकांनी त्यांना लक्षणांच्या यादीत टाकले होते. नुकत्याच केलेल्या संशोधनात दिसले की, २०-२५% रुग्ण चवीबाबत तक्रार करतात.

अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक होंगझियांग लियू यांनी सांगितले की, रुग्णांना विषाणूच्या संपर्कात आल्याच्या काही वेळानंतर चव लागत नसल्याचे समजते ही चिंतेची बाब आहे. या स्थितीवर आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याची गरज आहे. संशोधनानुसार स्वाद पेशी कोरोना संसर्गाच्या तावडीत येत नाहीत, कारण त्यातील बहुतांशींमध्ये एसीई२ नसते. एसीई२ एक रिसेप्टर आहे, जो कोरोनाला शरीरात घुसण्यास मदत करतो.

काेरोना व स्वाद पेशींमध्ये संबंध सांगणारे हे पहिलेच संशोधन आहे. संशोधनावेळी संशोधकांनी उंदरांच्या तोंडातील पेशींच्या आकड्यांचे विश्लेषण केले आणि पेशींमध्ये तर एसीई२ होते, मात्र स्वाद पेशींमध्ये ते नसल्याचे आढळले. म्हणजे विषाणू प्रत्यक्षपणे स्वाद पेशींना प्रभावित करत नाही.

बातम्या आणखी आहेत...