आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत फार्मसी घोटाळा:कोरोना औषधीचे सव्वापाच कोटींचे कर्ज लाटले, ऑर्डरद्वारे 64 कोटींची लूट

वॉशिंग्टन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे औषधींच्या नावाखाली निर्माण झालेल्या गदारोळाचा भारतवंशीय दोन भावांनी फायदा लाटला. अमेरिकेतील संकटात या दोघांनी गैरव्यवहाराची संधी साधली. अल्पेश व मनीष पटेल अशी त्यांची नावे आहेत. टेलिमेडिसिनच्या नावे रेवकू कंपनी स्थापन करून अमेरिकन सरकारच्या पेचेक प्रोटेक्शन प्रोग्राम (पीपीपी) अंतर्गत सुमारे सव्वापाच कोटी रुपयांचे कर्जही लाटले. टेक्सासच्या मेडिकल लीगल फर्म रिजन अँड रिझल्ट्समार्फत ‘टाइम’ला उपलब्ध झालेल्या दस्तऐवजानुसार मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान कर्जाची रक्कम रेवकू कंपनीला मिळाली. कोरोना काळात टेलिहेल्थ क्षेत्रात अमेरिकन सरकारमध्ये हलगर्जीपणा दाखवण्यात आला. टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशन व कोरोनाच्या वैध आैषधींची प्रचंड मागणीही वाढली होती. त्याचा पटेल बंधूंनी फायदा उचलला. कोरोना काळाच्या आधी पटेल बंधूंची २०२० मध्ये फ्लोरिडात एक काळ्या यादीतील कंपनी होती. या कंपनीवर बेकायदा प्रिस्क्रिप्शनच्या नावे कोट्यवधींचा दंड ठोठावण्यात आला होता. या कंपनीने दंडही भरला नाही. कोरोनाकाळात अचानक आैषधींच्या मागणीत झालेल्या वाढीचा फायदा घेत नवीन डिजिटल फार्मसी कंपनी रेवकूची नोंदणी करण्यात आली. अमेरिकेत कोरोनापूर्वी पटेल बंधूंच्या सुमारे १५ विविध कंपन्यांवर विविध घोटाळ्यातील खटले चालवले जात होते. केंद्रीय तपास संस्थेने त्याचा तपासही केला होता.

वंशभेदी डॉक्टरांच्या संघटनेशी साटेलोटे
रेवकू कंपनीने टेलिमेडिसिनचा प्रसार करण्यासाठी वंशभेदी डॉक्टरांची संघटना अमेरिकन फ्रंटनालाइन डाॅक्टर्सच्या (एएफएलडी) संघटनेशी हातमिळवणी केली. या संघटनेने रेवकू कंपनीच्या उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांनी सोशल मीडियावर कंपनीचा प्रचार केला. अमेरिकन आरोग्य संस्थेने अशा बोगस ऑनलाइन फार्मसी कंपन्यांबाबत जागृतीही केली, परंतु रेवकू कंपनीला नोटीस दिली नाही.

आता अमेरिकेने आयव्हरमॅक्टिनवर घातली बंदी
रेवकू कंपनीने आयव्हरमॅक्टिनचा पुरवठा केला. तोपर्यंत कोरोनाच्या एक वर्षापर्यंत अमेरिकन आरोग्य संस्था सीडीसी व एफडीएद्वारे बंदी घालण्यात आली नव्हती. मात्र आता एक सप्टेंबर रोजी अमेरिकन मेडिकल असोसिएशनसह इतर मोठ्या संघटनांनी आयव्हरमॅक्टिनचे प्रिस्क्रिप्शन व विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली. आयव्हरमॅक्टिनचा वापर कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेक देशांत करण्यात आला होता.

कीटक मारण्याचे आैषध पोहोचवले
पटेल बंधूंच्या कंपनीने वंडर ड्रगच्या नावे मनमानी वसुलीही केली. या आैषधीची मागणी वाढल्याचा गैरफायदा रेवकू कंपनीने घेतला. बहुतांश लोकांना डिलिव्हरी मिळाली नाही. एक पीडित म्हणाला, कंपनीने आयव्हरमॅक्टिनच्या एका गोळीसाठी पावणेसात हजार रुपये वसूल केले. आयव्हरमॅक्टिनच्या नावाखाली घोड्याच्या पोटातील कीटक मारणारी आैषधी मला मिळाल्याची तक्रार एका अन्य पीडिताने केली.

९६ टक्के ऑनलाइन कंपन्या नियम मोडतात
सेफ ऑनलाइन फार्मसी नावाच्या संघटनेच्या लिबी बानी म्हणाल्या, रेवकू कंपनीसारखी जगभरात अनेक प्रकरणे आहेत. संघटनेनुसार जगभरात सुमारे ३५ हजार ऑनलाइन फार्मसी कंपन्या सक्रिय आहेत. त्यापैकी ९६ टक्के कंपन्या कायदा व फार्मसी नियमांचे उल्लंघन करतात. औषधींबाबत ऑनलाइन सर्च केल्यास बहुतांश बेकायदा फार्मसी कंपन्यांची यादी समोर येते.

औषधी बाजारात तेजी येताच ३.५ लाख प्रिस्क्रिप्शनही घेतले
कोरोना काळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचाराच्या नावे बेकायदा आैषधींच्या बाजारात तेजी आली होती. त्याचा फायदा घेऊन रेवकू कंपनीने आयव्हरमॅक्टिन व हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (एचसीक्यू) यासाठी ३ लाख ४० हजार ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन मिळाले. रेवकूला नोव्हेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान ते मिळाले होते. द इंटरसेप्टला मिळालेल्या माहितीनुसार रेवकू कंपनीला ६४ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. त्यापैकी ३० टक्के ऑर्डरमधील वाटा जिंक व अजीथ्रोमायसिनचा होता.

बातम्या आणखी आहेत...