आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना संकटामुळे जगात सुमारे १५.६० कोटी मुले अजूनही शाळेत जाऊ शकत नाहीयेत. सुमारे २.५ कोटी मुले कधीच शाळेत परतणार नाहीत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ही भीती व्यक्त केली आहे. गुटेरेस यांनी सोशल मीडियावर म्हटले, कोरोनाकाळात जग शिक्षणाच्या संकटातून जात आहे. शाळा बंद आहेत. आपल्याला डिजिटल शिक्षणाला चालना द्यावी लागेल. भविष्यात मुलांच्या शिक्षणाच्या कामी येईल अशी व्यवस्था तयार करावी लागेल. युनिसेफचे प्रवक्ते जेम्स एल्डर यांनी सांगितले, कोरोनात जगभरात ६० कोटी मुले शाळेत जाऊ शकले नाहीत. आशिया व प्रशांत क्षेत्रातील सुमारे ५०% देशांत २०० दिवसांपासून शाळा बंद आहेत. दक्षिण अमेरिकेतील १८ देशांमध्ये पूर्ण वा अंशत: शाळा बंद आहेत. पूर्व व दक्षिण आफ्रिकी देशांत ५ ते १८ वर्षांची ४०% मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. पूर्व आशिया व प्रशांत क्षेत्रातील ८ कोटी मुले वंचित आहेत.
अमेरिका : लसीच्या जागृतीसाठी प्रभावशाली लोकांची मदत
सीडीसीच्या नुसार अमेरिकेत १८ ते ३९ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये ५०%पेक्षाही कमी लाेकांनी काेराेनाचे पूर्ण लसीकरण केले आहे. तसेच १२ ते १७ वर्षे वयाच्या ५८% मुलांनी एकही डोस घेतलेला नाही. तर अमेरिकेत ५० वर्षांवरील दोन तृतियांश लोकांनी लसीकरण पूर्ण केले आहे. मुले व तरुणांमधील कमी लसीकरणामुळे सरकार चिंतेत आहे. या लोकांना लसीकरणासाठी सरकारला प्रेरित करायचे आहे. म्हणून व्हाइट हाउसने एक टीम बनवली आहे. यात ५० टि्वच स्ट्रीमर, यूट्युबर्स, टिकटॉकर्स आणि १८ वर्षांचा पॉप स्टार गायक ओलिविया रोड्रिगोचा समावेश आहे. ही मंडळी मुले व तरुणांना लसीकरणासाठी ऑनलाइन जागृत करत आहेत. यात ५ हजार ते एक लाख फॉलोवर असणाऱ्यास दरमहा ७० हजार रुपये दिले जात आहेत.
लर्निंग पासपोर्ट तसेच रेडिओद्वारेही शिक्षण
युक्रेनसह अनेक देशांमध्ये ‘लर्निंग पासपोर्ट’द्वारे मुलांना ऑनलाइन शिकवले जात आहे. हा कार्यक्रम युनिसेफ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टने मिळून तयार केला आहे. यात मुलांना शिक्षणासाठी ऑनलाइन पुस्तके, व्हिडिओ उपलब्ध केले जात आहेत. तर युनिसेफने जगात १०० पेक्षा जास्त रेडिओ लिपी शोधल्या. याद्वारे मुलांना शिकवले जात आहे.
युनिसेफचा अहवाल : १४ देशांमध्ये वर्षभर मोठ्या प्रमाणात शाळा बंद
युनिसेफच्या ताज्या अहवालानुसार मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत जगातील १४ देशांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा बंद होत्या. यात भारताचाही समावेश आहे. या काळात या देशातील १६.८० कोटी मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. सर्वाधिक दिवस पनामात शाळा बंद राहिल्या. यानंतर बांगलोदशचा क्रमांक आहे. युरोप व उत्तर अमेरिकी देशांचा अहवालात उल्लेख नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.