आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात हाहाकार उडवणारी कोरोना महामारी पुढील एक वर्षात संपुष्टात येऊ शकते किंवा तिचा प्रभाव एका मर्यादेपर्यंत कमी होऊ शकतो. लस उत्पादक कंपनी मॉडर्ना इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीफन बेन्सेल यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. स्वित्झर्लंडमधील स्विस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीईओ स्टीफन बेन्सेल म्हणाले की, ‘कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनात वाढ झाल्याने लसीचा जागतिक पुरवठा वेगाने होत आहे.
या लसी लवकरच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोतील असा त्याचा अर्थ आहे. गेल्या सहा महिन्यांचा लस उत्पादनाचा वेग पाहिला तर पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सर्वांना देता येतील एवढे पुरेसे डोस उपलब्ध होतील, असा अंदाज बांधता येतो. ज्यांना बूस्टर डोसची गरज आहे त्यांनाही लस देता येऊ शकेल. लवकरच मुलांचे कोरोना लसीकरणही सुरू होईल. त्यामुळे एक सुरक्षित स्थिती तयार होऊ शकेल.’
लस न घेणाऱ्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते
बेन्सेल म्हणाले, ‘कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट खूप धोकादायक आहे. या व्हेरिएंटमुळे संक्रमित झालेले लोकही लस घेतल्यामुळे सुरक्षित राहू शकतात. पण ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. तथापि, ते बरे झाल्यानंतर त्यांच्यातही आपोआप कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती विकसित होईल.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.