आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona | Europe | Fourth Wave Kills More In Europe; Over 20 Million A Week, The Epidemic Protests Against Sanctions In European Countries

जनतेत नाराजी:युरोपमध्ये चौथ्या लाटेमुळे जास्त मृत्यू; आठवड्याला संख्या 20 लाखांवर, महामारी युरोपीय देशांत निर्बंधांच्या विरोधात निदर्शने

नताशा फ्रोस्ट12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युराेप पुन्हा एकदा काेराेनाचे केंद्र बनला आहे. या महिन्यात जगात काेराेनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी निम्म्याहून जास्त मृत्यू युराेपीय देशांत झाले आहेत. या विषाणूला राेखण्यासाठी युराेपीय देशांतील सरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करत आहे. त्याविराेधात तीव्र निदर्शने केली जात आहेत. ऑस्ट्रियाने पूर्ण लाॅकडाऊन लागू केला आहे.

जर्मनीचे आराेग्यमंत्री जेन्स स्पेन म्हणाले, वर्षअखेरीस जर्मनीतील लाेकांनी पूर्ण लसीकरण केलेले असेल किंवा ते पूर्णपणे ठणठणीत हाेतील किंवा त्यांचा मृत्यू तरी हाेईल. बाधितांची संख्या वाढत असतानाच बेल्जियमने मास्क अनिवार्य केला आहे. नागरिकांना घरूनच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कडक नियम व लसीसाठी प्राेत्साहन दिले जात आहे. परंतु सरकारी उपयायाेजनांसमाेर जनतेच्या नाराजीचे आव्हान आहे. कारण लाेक नियमांविराेधात रस्त्यावर उतरत आहेत. आॅस्ट्रिया, क्राेएशिया, बेल्जियम, डेन्मार्क, इटली, नेदरलँड्समध्ये असे चित्र आहे.

काही ठिकाणी पाेलिसांना अश्रुधुराचाही वापर करावा लागला. सार्वजनिक आराेग्याच्या नावाखाली सामान्य जीवनातील हस्तक्षेपाला आम्ही कंटाळलाे आहाेत, असे आंदाेलकांचे म्हणणे आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टॅक्स यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. ते दहा दिवस घरी राहूनच कामकाज पाहतील.

युराेपीय देशांकडून प्रवासी नियमांचा आढावा, अनेक ठिकाणी मास्क अनिवार्य

जर्मनी : अनिवार्य करण्यावर सरकारचा विचार
जर्मनी लस अनिवार्य करण्यावर विचार करत आहे. डाेस न घेणाऱ्या चाकरमान्यांना दरराेज तपासणी करणे अनिवार्य करावे लागेल. मेट्राे-ट्रेनमध्येही अहवाल दाखवावा लागेल. ६८ टक्के वयस्कर लाेकांना डाेस देण्यात आला आहे. इतर युराेपीय देशांच्या तुलनेत लसीचा दरही कमी आहे.

ग्रीस : सार्वजनिक ठिकाणी लस अनिवार्य
ग्रीस, झेक रिपब्लिकन व स्लाेव्हाकियामध्ये लस न घेणाऱ्यांना इनडाेअर ठिकाणी प्रवेशास मनाई असेल. रेस्तराँमध्येही बंदी असेल. स्लाेव्हाकियाने लसीकरण नसलेल्या लाेकांसाठी लाॅकडाऊन केला आहे. थाेडक्यात, सार्वजनिक ठिकाणी वावरता येणार नाही.

इटली: बूस्टर डाेस सुरू, ५ महिन्यांचे अंतर
इटलीने दाेन्ही डाेस घेणाऱ्या लाेकांसाठी बूस्टर सुरू केले आहे. दुसऱ्या डाेसच्या पाच महिन्यांनंतर लाेकांना बूस्टर डाेस घेता येऊ शकेल. त्याशिवाय इटलीत आता डाेस न घेणाऱ्यांना यापुढे सरकारी आराेग्य याेजनांचा लाभ मिळणार नाही.त्यामुळे सामान्य नागरिकांची सोय होईल.

ब्रिटन : शाॅपिंग करणाऱ्यांना तपासणी अनिवार्य
ब्रिटनमध्ये काेविड वेगाने पाय पसरू लागला आहे. गेल्या चाेवीस तासांत सुमारे ४५ हजार नवे रुग्ण आढळून आले. नाताळच्या खरेदीसाठी काेविड टेस्ट अनिवार्य आहे. साेबतच ब्रिटन जानेवारीत प्रवासी नियमांचा आढावा घेईल.

बातम्या आणखी आहेत...